सुखी वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक समस्या या अनेकदा अडसर ठरतात, तसेच संतानप्राप्तिमध्येही समस्या उत्पन्न होतात. यातून बऱ्याचदा नाती तुटतात आणि त्यातून मोठी सामाजिक समस्यादेखील तयार होते. या स्थितीत सातत्याने लैंगिक समस्यांविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांचे निराकरण करणारे तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी सखोल मार्गदर्शन देणारे सेक्सोलाॅजी मधील एम.एस.(सेक्स), पी .जी.डिप्लोमा (सेक्स), पीएचडी (सेक्स), करणारे डाॅ. प्रभू व्यास यांना नुकताच इन्स्पायरिंग सेक्सोलाॅजिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. व्यास यांनी सेक्सोलाॅजी संदर्भात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात हा आला.
पुण्यातील पीवायसी हिंदू जीमखाना येथे झालेल्या सेक्सोलाॅजिस्टच्या या राष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डी. हार्टमॅन (अमेरिका), केईएम मुंबईचे सुप्रसिद्ध सेक्सोलाॅजिस्ट डाॅ. प्रकाश कोठारी, नानावटी सुपर स्पेशालिटीचे डाॅ. राज ब्रम्हभट, चेन्नई अपोलो हाॅस्पिटलचे सेक्सोलाॅजिस्ट डाॅ. नारायण रेड्डी, सेक्सोलाॅजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. व्यंकटरमणा (हैदराबाद) या सर्वांनी डाॅ. व्यास यांना ट्राॅफी, सर्टिफिकेट, पुणेरी पगडी, शाल व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर सुप्रसिद्ध सेक्सोलाॅजीस्ट डाॅ. प्रभू व्यास म्हणाले की, आजच्या काळात संवाद आणि संचार माध्यमे वाढली असतानाही आपल्या परिवारातील लोकांशी आपला संवाद मात्र कमी झाला आहे. त्यातही लैंगिक समस्यांवर तर अजिबातच संवाद नसल्याने कौटुंबिक कलह तीव्र झाले आहेत. परंतु या समस्येवर उपाय आहे. त्यासाठी योग्य ते काउन्सलिंग आवश्यक आहे. योग्य व अनुभवी सेक्सोलाॅजीस्टकडे आपल्या समस्या मांडून होणाऱ्या संभाव्य गंभीर परिणामांना टाळले जाऊ शकते. प्रगत राष्ट्रांमध्ये ही प्रक्रिया आहे, परंतु भारतात त्यासंदर्भात जनजागृती होणे अजूनही गरजेचे आहे.
डाॅ. व्यास यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईतील नामांकित हाॅस्पिटल्समध्ये वैद्यकीय सेवा दिली आहे. लैंगिक समस्यांवर मार्गदर्शन देऊन त्यासंदर्भात समाजात एक मुक्त चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने डाॅ. प्रभू व्यास यांचे चांगले कार्य आहे. त्यांनी स्वतः १२६ वेळा रक्तदान केलेले आहे. डाॅ. व्यास यांच्यामुळे अनेक कुटुंबांमधील लैंगिक समस्यांचे निराकरण झाल्याने पुढे त्यांचे संसार सावरले गेलेले आहेत. ते आजही अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून यासंदर्भात जनजागृती करीत आहेत, तसेच व्हिडिओ कन्सल्टेशनच्या माध्यमातून ते लैंगिक समस्यांसंदर्भात मार्गदर्शन पण देत असतात.