पुणे प्रहार डेस्क – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्मार्टफोन धारकांसाठी अनेक महत्त्वाच्या बातम्या आल्या. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीला अक्षरशः सुपर बंपर धमाका लागलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता काही दिवसातच 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस येत असल्याकारणाने अनेक ऑटोमोबाईल, मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स आयोजित केलेल्या आहेत.
या ऑफर च्या माध्यमातून स्मार्टफोन धारक अगदी आपल्या खिशाला परवडतील असे विविध फोन विकत घेऊ शकतात. 26 जानेवारी च्या पर्वणीवरच आता मोटोरोला कंपनीने देखील नवीन ऑफर आणलेली आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत घसरलेली आहे म्हणूनच आता ग्राहकांना देखील आवडीचे फीचर्स असलेला मोबाईल सहजच विकत घेता येणार आहे.
मोटोरोला कंपनीने आतापर्यंत बाजारामध्ये विविध मॉडेल लॉन्च केले. या सर्व मॉडेल ला भारतीयांनी मनसोक्त प्रतिसाद देखील दिलेला आहे,परंतु आता 26 जानेवारी च्या निमित्ताने मोटोरोलाचा मोटो जी 85 या मॉडेलची किंमत घसरलेली आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिकन डे सेल च्या निमित्ताने कंपनीने या मोबाईलची किंमत कमी केलेली आहे.
या स्मार्टफोनची किंमत 16,999 पर्यंत कमी करण्यात आलेली आहे , यामुळे मोबाईल प्रेमीच्या त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या रिपब्लिकन डे च्या निमित्ताने 1000 रुपयाची सूट देखील देण्यात आलेली आहे. बँक कार्डवर हा मोबाईल जर तुम्ही विकत घेत असाल तर तिथे देखील तुम्हाला ऑफर देण्यात आलेली आहे म्हणूनच मिडल रेंज मध्ये उपलब्ध असणारा हा मोबाईल सर्वसामान्य जनतेसाठी खिशाला परवडणारा आहे. एक्सचेंजवर हा मोबाईल फोन 11,300 रुपयाला उपलब्ध आहे परंतु तुम्ही जो फोन एक्सचेंज करणार आहे त्याची कंडिशन चांगली असायला हवी तरच तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल.
असे आहेत फीचर्स:
क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन 6 s Gen 3 चीपसेट प्रोसेसर आहे. हा मोबाईल फोन तुम्ही पावसाळ्यात देखील वापरू शकता कारण की या मोबाईल फोन मध्ये आयपी 52 रेटेड वॉटरप्रूफ सुविधा आहे. फिंगरप्रिंट सोबतच ड्यूयल स्पीकर फीचर्स उपलब्ध आहे. यामध्ये ड्युअल रेअर सेटअप कॅमेरा असून सुट्टी मेगापिक्सल एलटीआय 600 प्रायमरी कॅमेरा आहे. आठ मेगापिक्सल कॅमेरा असून 8000mAh वॅट बॅटरी गुणवत्ता देखील चांगली आहे.
असे विविध फीचर्स असलेला मोटोरोला हा स्मार्टफोन तुम्हाला अगदी स्वस्तात रिपब्लिक डे सेलच्या निमित्त उपलब्ध होणार आहे म्हणूनच मोटोरोला कंपनीने देखील ग्राहकांना आवाहन केले आहे की, हा फोन तुम्ही जास्तीत जास्त विकत घ्या आणि आपल्या खिशातील पैसे वाचवा..