पुणे प्रहार डेस्क – समाज प्रगतिशील झाला असला तरी आंतरजातीय विवाह पद्धतीला अजून मान्यता मिळालेली नाही. त्याचबरोबर जरी मान्यता मिळाली तरी मनामध्ये द्वेष ठेवून ही मंडळी वावरत आहेत, अशीच एक दुर्घटना घडलेली आहे. जळगाव शहरामध्ये या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सैराटची निर्मिती पाहायला मिळाली. आपण सर्वांनी सैराट चित्रपट पाहिला असेल.
या चित्रपटांमध्ये नायक व नायकांनी पळून लग्न करून प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी मनामध्ये द्वेष ठेवून या जोडप्याची हत्या देखील केली होती, अशीच काही कथेची पार्श्वभूमी असलेली घटना जळगाव शहरात घडलेली आहे
अवघ्या चार वर्षानंतर प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी जावयाचा निर्घृण पद्धतीने खून केलेला आहे. हे घटना जळगाव जिल्ह्यातील पिंपळा परिसरात घडली आहे. धारदार शस्त्राच्या मदतीने सासरच्या मंडळीने जावयाची हत्या केल्याने सगळीकडे खळबळ जनक वातावरण निर्माण झाले आहे. या तरुणावर अक्षरशः कविता आणि चॉपरने वार करण्यात आलेले आहे. मुकेश रमेश शिरसाट असे प्रेम विवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
या हल्ल्यामुळे मुकेशच्या जागीच मृत्यू झालेला आहे, तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झालेले आहे जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटने प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा तरुण मध्यम कुटुंब वर्गातला असून मुकेशच्या मागे त्याचे आई-वडील भाऊ-बहीण पत्नी व मुलगी आहे घडलेल्या या प्रकरणामुळे चिमुकलीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुकेशने चार वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी पळून जाऊन लग्न केले होते. या दोघांचा एकमेकांवर प्रेम होते त्यानंतर शिरसाट कुटुंब व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू झाले होते. रविवार सकाळी मुकेश दुकानावर बाहेर जाण्यासाठी निघाले असताना त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपर ने मुकेश च्या मानेवर वार केला. घडलेल्या या घटनेत मुकेश जखमी झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
घडलेल्या या घटनेमुळे समाजातील विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे, त्याचबरोबर पूजाच्या माहेरील मंडळी वरील लोकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. घडलेल्या या सगळ्या घटनेमुळे चिमुकलेच्या डोक्यावरील पितृ छत्र हरवले असल्याने नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.