नऊ दिवस खोलीत डांबून तरुणीवर केला लैंगिक अत्याचार, बारामती मध्ये घडला दुर्दैवी प्रकार !

पुणे प्रहार डेस्क -पुणे शहरामागे मग आता बारामती देखील महिलांकरिता सुरक्षित राहिली नाही. खुद्द गृहमंत्री उपमुख्यमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या शहरातच आता महिलांची गळचेपी होताना दिसून येत आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचार यामुळे महिला देखील सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करत आहेत. ही घटना बारामती शहरात घडलेली आहे. परप्रांतीय महिलेला रोजगार देतो असे सांगून एका तरुणाने या महिलेवर नऊ दिवस अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे.

ही घटना कळताच स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी या नराधमाला अटक केलेली आहे. बारामती तालुक्यातील पंढरी गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या परिसरात एका हॉटेलच्या पाठीमागील पत्राच्या रूममधून या महिलेला सोडवण्यात आलेले आहे.

पोपट खामगळ असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित महिला मुळशी मध्य प्रदेश येथे राहणारी आहे. ती तळेगाव दाभाडे येथे पतीसोबत काम करायची कंपनीतील काम सुटल्याने तिचा पती गावी गेला होता. ती एकटीच असताना एका महिलेने तिची ओळख पोपट खामगळशी करून दिली. त्याचा हॉटेल व्यवसाय असून तेथे काम मिळेल असे देखील सांगितले. या कामाचे या महिलेला पंधरा हजार रुपये मिळणार होते म्हणूनच पोपटणे या महिलेला 2 जानेवारी रोजी कामावर बोलवले.

तीन जानेवारी रोजी पत्राच्या खोलीत ही महिला झोपलेली असताना त्यांनी पहाटेच्या वेळी महिलेवर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. घडलेला प्रकार जर इतरांना सांगितल्यास खून करेल त्याचबरोबर तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी काही माणसे देखील पाळत ठेवलेली आहे, अशी धमकी या महिलेला दिली. सलग नऊ दिवस म्हणजेच 11 जानेवारीपर्यंत पोपट या महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याचबरोबर हॉटेलमध्ये एक जोडपे देखील कामाला होते. त्या जोडप्याला लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार कर अशी देखील धमकी या महिलेला देण्यात आली होती.

शेवटी संधी पाहून या महिलेने जोडप्यांच्या मोबाईल वरून आपल्या नातेवाईकांना संपर्क साधला. नातेवाईकांनी ही सगळी घटना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदवली पोलिसांना हा घडलेला प्रकार कडला आणि पोलिसांनी या महिलेची सुटका केली. घडलेल्या या संपूर्ण प्रकारणामुळे बारामती शहरात असुरक्षितता पसरलेली आहे. या प्रकरणाची चौकशी आणि तपासणी पोलीस अधिकारी करत आहेत.

घडलेल्या घटनेत प्रकरणी पोलिसांनी या आरोपीला अटक देखील केलेली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे सपोनि सचिन लोखंडे, कुलदीप संकपाळ, संध्याराणी देशमुख, देवा साळवे, अमोल खटावकर, अंमलदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे, गोदावरी केंद्रे यांनी केला.