कौटुंबिक वाद पोहचला विकोपाला, पत्नीवर वार करून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न!

पुणे प्रहार डेस्क – कौटुंबिक हिसाचारामुळे अनेक संसार उध्वस्त झालेली आहेत. मारामारी पती-पत्नीतील वाद छोट्या-मोठ्या गोष्टीमुळे घडणाऱ्या वादाचा परिणाम अनेकदा मोठ्या घटनांमध्ये होताना दिसून येतो, अशीच एक घटना पुणे शहरांमध्ये घडलेली आहे. कौटुंबिक वादामुळे एका महिलेवर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर या परिसरात घडली आहे. या घटनेमुळे महिला व तिचा पती दोन्ही जण झालेले असून या दोघांवरच जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसिमा मुल्ला, अमजद मुल्ला अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

घडलेल्या घटना प्रकरणी गणेश लंके यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला हा व्यवसायाने टेम्पोचालक आहे. त्याची पत्नी नसिमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद अनेकदा व्हायचे. नसिमाचे नातेवाईक बाणेर भागात राहायला आहेत.

नसिमा आणि अमजद नातेवाइकांना पुण्यात भेटायला आले होते. बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये हे दोघे उतरले होते. सोमवारी 13 जानेवारी सकाळी दोघांमध्ये हॉटेलच्या खोलीत वाद झाले. हा वाद विकोपाला पोहचला. त्यानंतर संतापात अमजदने पत्नी नसिमावर चाकूने वार केला, त्यानंतर अमजदने स्वत:च्या गळ्यावर तसेच पोटावर चाकूने वार केले. घडलेल्या घटना प्रकरणी दोघेही गंभीर जखमी झाले.

विकोपाला गेलेला वाद यामुळे आरडाओरडा ऐकून कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. घडलेली घटना कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व सहकारी टीम घटनास्थळी पोहचली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सध्या तरी दोघे दाम्पत्य जखमी असून दोघांवर उपचार चालू आहे.