पुणे प्रहार डेस्क – पत्रकारिता हे क्षेत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकार समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन करत असतात आणि म्हणूनच पत्रकारांना समाजमनाचा आरसा असे संबोधले जाते परंतु समाजाचा विचार करणारे, समाजाचे उज्वल भविष्य घडवणारे पत्रकारच आता धोक्यात आहे. यांचे भवितव्य अंधारात गेले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
त्याचबरोबर आपल्या बेधडक निर्भर पत्रकारितेमुळे विशेष ओळख असणाऱ्या पत्रकारांना आता पत्रकारिता केल्यामुळे जीवाला मुकावे लागत आहे. अशीच एक खळबजण घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. या राज्यात चक्क भ्रष्टाचार उघड केल्यामुळे पत्रकाराचीच हत्या करण्यात आलेली आहे. हत्या केल्यानंतर या पत्रकाराचा मृतदेह पाण्याच्या टाकीत दुर्दैवी अवस्थेमध्ये आढळला आहे. या हत्ये मुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
छत्तीसगडमधील बस्तर या विभागातील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्राकर हे एक जानेवारी रोजी बेपत्ता झाले. त्यानंतर 3 जानेवारी रोजी यांचा मृतदेह सेप्टिक टॅकं मध्ये आढळून आला. पत्रकार मुकेश यांनी रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. ज्या रस्त्यावर काम सुरू होते, त्याच ठिकाणी दुर्दैवी अवस्थेत मुकेश यांचा मृतदेह सापडला.
हा सेप्टिक टॅंक त्याच रस्त्यावर असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केलेली आहे व त्याचबरोबर पोलिसांनी अनेकांना ताब्यात देखील घेतले आहे. पत्रकार मुकेश यांनी रस्त्याच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात वार्तांकन केल्यामुळे मुकेश यांचा खून करण्यात आला आहे अशी चर्चा रंगत आहे.
आतापर्यंत मुकेश चंद्राकार यांनी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकारितेचे काम केले होते त्याचबरोबर बस्तर जंक्शन नावाचे त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील होते. या चॅनेलवर त्यांनी अनेक मंडळींचा पडदाफाश देखील केला होता. त्याचबरोबर बस्तर यांनी नक्षलवादी भागात आजपर्यंत मिळत पत्रकारिता केली होती. 2021 एप्रिलमध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. त्यांना सोडविण्यात मुकेश चंद्राकर यांची महत्त्वाची भूमिका होती. भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे एका चांगल्या पत्रकाराचा अशाप्रकारे खून होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पत्रकार संघ आणि माध्यम क्षेत्रातून या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिकारी या घटनेचा अधिक तपास घेत आहेत.
मुकेश आणि आतापर्यंत विविध भ्रष्टाचार उघडकीस आणले होते आणि म्हणूनच माध्यम क्षेत्रामध्ये त्यांची ओळख देखील तितकीच महत्त्वाचे होती. ही घटना घडल्याचे कळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट केली. मुकेश यांच्या हत्येमुळे पत्रकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असे देखील त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांनी लवकरच या घटनेचा तपास करावा आणि दोषींवर कारवाई करावी अन् शिक्षा द्यावी असा आदेश देखील पोलीस प्रशासनाला दिला आहे.