आपल्या सर्वांना माहितीच आहे, की हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर दिवसाला लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. अनेक विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करून रिल्स बनवत असतात आणि लवकरच प्रसिद्धी मिळवतात. असाच एक प्रकार माजी विद्यार्थ्यांनी केला परंतु या रिल मुळे चक्क मुख्याध्यापकांवरच नोकरी गमावण्याची वेळ आलेली आहे.
आपण सर्वांनी सिंघम चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये अजय देवगन वेगवेगळ्या स्टंट च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. अशीच ॲक्शन स्टंट माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये केल्याचे पाहायला मिळाले. या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये जाऊन वर्गातील बेंच यांना लाथा मारून एक व्हिडिओ शूट केला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले आहे. ही घटना कळताच शाळेच्या प्रशासनाने देखील मुख्याध्यापकांकडून या घटनेबाबत खुलासा मागितला आहे.
ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे. करवीर तालुक्यातील दराचे वडगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत चित्रपटातील एका डायलॉगवर व्हिडिओ बनवण्यात आला त्याचबरोबर मुख्याध्यापकांनी आपणच फोटो काढण्यासाठी परवानगी दिली होतीअशी धक्कादायक माहिती देखील कबुली दरम्यान मिळाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांनी तत्काळ खुलासा मागवला असून मुख्याध्यापकांवरील निलंबनाची कारवाई अटळ असल्याची चर्चा रंगत आहे.
शाळेच्या आवारात घडलेली ही घटना शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्यामुळे आता शाळेच्या सुरक्षा यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शाळेमध्ये सुरक्षा व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न संतप्त पालक वर्ग करत आहे.
भविष्यात कुठेही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड करून अनुचित प्रकार होऊ नये तसेच सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेची बदनामी होऊ नये याकरिता भविष्यात कडक पावले उचलले जातील असे देखील जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी माध्यमांना सांगितले. जर कोणत्याही प्रकारची हलगर्जी दिसल्यास शालेय प्रशासनावर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती देखील माध्यमांना दिली आहे.