पुणे प्रहार डेस्क
गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसून येत आहे. चोरी, खून, आत्महत्या, दरोडे, फसवणूक अशा घटना काही थांबायचे नाव घेत नाही. पुण्यातील जनता अक्षरशः चोरांपासून वैतागलेली आहे. पोलिसांना देखील वारंवार आरोपींना पकडण्यात येत असलेल्या अपयशांमुळे पोलिसांसमोर देखील अडचणी वाढतांना दिसून येत होत्या परंतु आता पुणे पोलीस प्रशासनाने अट्टल गुन्हेगारांना धडा शिकवायचे ठरवले आहे म्हणूनच पुण्यातील पोलीस प्रशासनाने अट्टल गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा काढला आहे. या गुन्हेगारांवर आता कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही आणि म्हणूनच पुणे पोलीस खात्याचे आयुक्त यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना स्थान बद्ध करण्याची कारवाई सुरू केली आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमित कुमार यांनी आता महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून पुणे पोलीस यांची डोकेदुखी काही थांबायची नाव घेत नव्हती म्हणूनच नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस आयुक्त अमित कुमार यांनी गुन्हेगारांना धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमित कुमार यांनी शहरातील 103 अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेले आहे. या गुन्हेगारांना राज्यातील विविध भागात नेऊन तुरुंगात दामण्याचे आदेश देखील दिलेले आहे, जेणेकरून भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकेल व त्याचबरोबर गुन्हेगारी करण्याचा शक्यतो कोणी प्रयत्न देखील करणार नाही. या सर्व १०३ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध हे एका वर्षासाठी करण्यात येणार आहे म्हणूनच पुढील काही महिने पुण्यामध्ये शांतता राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहरांमध्ये चोरी, आत्महत्या, खून, दरोडा , फसवणुकीच्या घटना, लाच , खंडणी वसुलीच्या घटना वेगाने पसरत आहे त्यामुळे गुंड राज दहशत पसरवताना दिसून येत आहे. या सर्वांच्या मुसक्या आवळण्याचा विचार पुणे आयुक्तांनी केलेला आहे. या सर्व गुन्हेगारांना कोल्हापूर, मुंबई, अकोला, नाशिक, पुणे यासारख्या ठिकाणी जेलबंद केले जाईल.