- २४हून अधिक अॅप्स व ३०० हून अधिक वाहिन्यांसाठी सिंगल साइन-ऑन, सिंगल सबस्क्रिप्शन आणि एकात्मिक इंटरफेस देऊन काँटेण्ट शोधण्यातील आव्हानांवर मात
- सहयोगींमध्ये प्राइम व्हिडिओ, जिओ सिनेमा, डिस्ने हॉटस्टार या अव्वल ओटीटींसह झी5, सोनी लिव्ह, यूट्यूब, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, अहा, होईचोई, लायन्सगेट प्ले, मनोरमा मॅक्स, ट्रॅव्हल एक्सपी, शेमारू, फॅनकोड, ममाफ्लिक्स, दंगल प्ले, डॉलीवूड प्ले, हंगामा, स्टेज, व्हीआर ओटीटी, डिस्ट्रो टीव्ही, चौपाल, प्लेफ्लिक्स, ईटीव्ही विन, राज टीव्ही आणि अन्य प्लॅटफॉर्म्सचा समावेश
- फ्लिपकार्टवर उपलब्ध आणि अन्य रिटेल सहयोगींकडेही लवकरच उपलब्ध होणार
स्ट्रीमबॉक्स मीडिया हे अनुज गांधी यांनी स्थापन केलेले व मायक्रोमॅक्स इन्फोरमॅटिक्सने निखिल कामत व स्ट्राइड व्हेंचर्सच्या साथीने पाठबळ दिलेले धोरणात्मक माध्यम-तंत्रज्ञान व्हेंचर डोर या भारतातील पहिल्या सबस्क्रिप्शनवर आधारित टेलिव्हिजन सेवेचे अनावरण करत आहे. तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष व वापरकर्त्याला अखंडित अनुभव देणे यांवर लक्ष केंद्रित करणारी डोर ही सेवा भारतातील कुटुंबांमध्ये घरी व प्रवासात असताना मनोरंजन उपलब्ध करून घेण्याची व त्याचा आनंद लुटण्याची पद्धत बदलून टाकण्यास सज्ज आहे. हे अशा प्रकारचे एकमेव उत्पादन व सेवा (प्रोडक्ट-अॅज-अ-सर्व्हिस) प्रारूप १ डिसेंबर, २०२४ रोजी फ्लिपकार्टमार्फत भारतात सुरू होणार आहे. त्यानंतर ते अन्य प्लॅटफॉर्म्सवर आणि प्रत्यक्ष वितरण परिसंस्थेद्वारेही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ही चाकोरीबाह्य सबस्क्रिप्शन सेवा उच्च कामगिरी करणाऱ्या 4के क्यूएलईडी टीव्हीचे एसव्हीओडी ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स, एव्हीओडी प्लॅटफॉर्म्स, लाइव्ह (थेट प्रक्षेपण करणाऱ्या) वाहिन्या, गेमिंग, न्यूज आणि अशा अनेक प्लॅटफॉर्म्ससोबत एकात्मीकरण एकाच, परवडण्याजोग्या मासिक सबस्क्रिप्शन योजनेद्वारे करणार आहे. भारतात एतद्देशीयरित्या डिझाइन व विकास करण्यात आलेल्या डोर टीव्ही ओएसची शक्ती लाभलेला हा सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म ग्राहकांना अंत:प्रेरणाधारित व एकात्मिक व्ह्यूइंग अनुभव मिळेल याची खात्री करतो, अनेकविध उपकरणे व अॅप्समधून विखंडित पद्धतीने वाट काढत राहण्याची गरज यामुळे उरत नाही.
LINK OF CAMPAIGN FILM:
मायक्रोमॅक्स इन्फॉरमॅटिक्सचे सह–संस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांचे विचार मांडले: “सबस्क्रिप्शन व लीजिंग मॉडेल्सच्या उदयामुळे होम एण्टरटेन्मेंट विभागात उलथापालथ घडवून आणणारी स्थित्यंतरे घडत आहेत. अधिक तरुण प्रेक्षक, जेन वाय व झूमर्स यांचा भर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेण्यावर आहे, लवचिकता व मूल्य यांना त्यांचे प्राधान्य आहे. डोरच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांच्या मागण्या पूर्ण करणारी बाजाराच्या चाकोऱ्या मोडणारी सेवा देत आहोत. भारतात एतद्देशीयरित्या डिझाइन व विकास करण्यात आलेल्या डोर ओएसचा लाभ घेत, ही सबस्क्रिप्शन सेवा, भविष्यकालीन तंत्रज्ञान जागतिक बाजारपेठांमध्ये जे साध्य करू शकते ते सर्व हस्तगत करत आहे. आमच्या ग्राहकांना परवडण्याजोगे दर व नवोन्मेष या दोन्हींसह एकात्मिक सेवा देऊन, डोर भारतीय मनोरंजन परिसंस्थेचा चेहरमोहरा बदलून टाकण्यास सज्ज आहे असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो.”
स्ट्रीमबॉक्स मीडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गांधी यांनी या लाँचबद्दल उत्साह व्यक्त केला: “भारतातील कनेक्टेट टीव्ही परिसंस्था वेगाने उत्क्रांत होत आहे, कनेक्टेड टीव्ही घेतलेल्या कुटुंबांची संख्या पुढील पाच वर्षांत ५० दशलक्षांवरून १०० दशलक्ष (पाच कोटींवरून १० कोटी) होणार असे अपेक्षित आहे. मात्र, विखंडित सेवा व मोठा आगाऊ खर्च यांमुळे संभाव्य वापरकर्त्यांचा मोठा वर्ग कनेक्टेड टीव्ही सेवा घेण्यापासून परावृत्तही होत आहे. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान व अनेकविध काँटेण्ट प्लॅटफॉर्म्स यांचे एकात्मीकरण करून डोर ही तफावत भरून काढत आहे. स्वत: विकसित केलेल्या डोर ओएसच्या माध्यमातून अति-व्यक्तिनुरूपता (हायर-पर्सनलायझेशन) व अंत:प्रेरणाधारित (इंट्युइटिव) काँटेण्ट शोध यांचा मेळ एका सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये घातला जात आहे.
भारतातील अशा प्रकारचे पहिलेच टीव्ही–अॅज–अ–सर्व्हिस मॉडेल असलेले डोर भविष्यकाळासाठी सज्ज नवोन्मेष म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करत आहे, प्रचंड वाढीची संभाव्यता असलेल्या पोहोचण्याजोग्या बाजारपेठेला अद्वितीय मूल्य देऊ करत आहे. येत्या काळात ग्राहकांसाठी ‘घेतलेच पाहिजे’ असे उत्पादन होण्याची क्षमता डोरमध्ये आहे असे आम्हाला ठामपणे वाटते आणि म्हणूनच आम्ही सुरक्षा व सॉफ्टवेअर अपग्रेड्सच्या माध्यमातून ४ वर्षांची वॉरंटीही देऊ करत आहोत. खऱ्या अर्थाने फरक घडवून आणण्यासाठीच आम्ही काम करत आहोत.”
स्ट्रीमबॉक्स मीडियाचे सीओओ रोमिल रामगऱ्हिया म्हणाले, “भारतीय घरांमध्ये प्रवेश करण्यातील अडथळे लक्षणीयरित्या कमी करून उच्च दर्जाच्या अव्वल मनोरंजनाची उपलब्धता सार्वत्रिक करण्याचे लक्ष्य डोरपुढे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान ही आता चैन राहिली नसून सर्वांसाठी उपलब्ध सेवा आहे याची निश्चिती या नवोन्मेष्कारी दृष्टिकोनाद्वारे केली जाईल. अति-व्यक्तिनुरूप शिफारशी, एकात्मिक काँटेण्ट अनुभव, स्मार्ट अपग्रेड्स व अद्वितीय काँटेण्ट शोध यांचा लाभ घेत भारतात परवडण्याजोग्या स्मार्ट टीव्ही सोल्यूशन्सच्या शोधात असलेल्या १०० दशलक्षांहून अधिक कुटुंबांच्या माध्यमातून बाजारपेठेत लक्षणीय वाटा हस्तगत करण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्मार्ट टीव्ही व काँटेण्ट सेवांचा खर्च एकत्र करून भारतीय कुटुंबांना ५०–६० टक्के खर्च कपात करवून देऊन डोर परवडण्याजोगे दर व सोयीस्कर सेवा यांची व्याख्याच नव्याने करत आहे. म्हणूनच, प्रारंभिक सेवा ४३ इंची मॉडेलमार्फत दिली जात असली, तरी अधिक व्यापक ग्राहकवर्गाला सेवा देण्यासाठी आम्ही आमचा पोर्टफोलिओ जलद गतीने ५५ इंची व ६५ इंची प्रकारांमध्ये विस्तारण्यास सज्ज आहोत.”
भविष्यकाळासाठी सज्ज सबस्क्रिप्शन मॉडेल
डोर टीव्हीचे अनन्यसाधारण सबस्क्रिप्शन मॉडेल ग्राहकांना उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करून घेण्यासाठी एक लवचिक व किफायतशीर मार्ग देऊ करते. रु. १०,७९९ या आगाऊ शुल्कामध्ये अॅक्टिवेशन शुल्क व एक महिन्याची सबस्क्रिप्शन सेवा समाविष्ट असते. हार्डवेअर, काँटेण्ट व सातत्यपूर्ण सॉफ्टवेअर अपडेट्स यांच्या सर्वसमावेशक पॅकेजचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. पहिल्या महिन्यानंतर १२ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन कालावधीसाठी टीव्हीचे सबस्क्रिप्शन शुल्क मासिक रु. ७९९ आहे. त्यानंतर ग्राहक त्यांच्या बघण्याच्या अनुभवावर आधारित कस्टमाइझ्ड पॅकेजचा पर्याय घेऊ शकतात. टेलीव्हिजनसोबत चार वर्षांची वॉरंटी व उत्पादन अपग्रेड करण्याचे पर्याय येतात, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीने मुक्तपणे काँटेण्टचा आस्वाद घेण्याची मुभा मिळते.
अद्वितीय व्ह्यूइंग अनुभव
४३ इंची क्यूएलईडी टीव्ही फोरके अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन देऊ करतो, त्यामुळे सुस्पष्ट, प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात तशी दृश्ये यावर दिसतात. तसेच डॉल्बी ऑडिओ बुडवून टाकणारा ध्वनी अनुभव देतो. एकात्मिक डोर ओएस २४हून अधिक ओटीटी अॅप्स व ३००हून अधिक वाहिन्यांचे एकत्रीकरण एका साइन–ऑन व एका सबस्क्रिप्शनमध्ये करते. त्यामुळे मनोरंजनाचा अनुभव अखंडित राहतो. डोरच्या एआय–पॉवर्ड शोध व संशोधन क्षमता आणि आलेखांच्या विस्तृत ज्ञानावर आधारित अंत:प्रेरणाधारित नेविगेशन यांद्वारे हा एकात्मिक अनुभव अधिक उंचीवर नेला जातो.
डोरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सजग रचनेत सौरऊर्जेवर आधारित रिमोट कंट्रोलचा समावेश आहे. हा रिमोट कंट्रोल सामान्य घरातील प्रकाशामध्ये स्वयंचलितरित्या चार्ज होतो, त्यामुळे टाकून द्याव्या लागणाऱ्या बॅटऱ्यांची गरज उरत नाही. अनन्यसाधारण कम्पॅनियन अॅपच्या माध्यमातून डोर टीव्ही वापरकर्ते बाहेर असतानाही काँटेण्टचा आस्वाद घेऊ शकतात. एका सबस्क्रिप्शनवर कमाल ५ वापरकर्ते काँटेण्ट डाउनलोड करू शकतील, असा पर्याय यात आहे.
उपलब्धता
४३ इंची डोर सबस्क्रिप्शन टीव्ही १ डिसेंबर, २०२४ पासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध असेल. रु. ७९९ मासिक सबस्क्रिप्शन फी आणि रु. १०,७९९ आगाऊ अॅक्टिवेशन शुल्क (यामध्ये एका महिन्याचे सबस्क्रिप्शन शुल्क समाविष्ट आहे) या किमतीला सबस्क्रिप्शन टीव्ही उपलब्ध आहे. ५५ इंची व ६५ इंची पर्याय २०२५ सालाच्या सुरुवातीला उपलब्ध करून दिले जातील आणि भारतीय ग्राहकांसाठी उत्पादनश्रेणीचा विस्तार होईल.