झेल एज्युकेशनने विशेष गोलमेज परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केले, ज्यामध्ये भारतभरातील टॉप युनिव्हर्सिटीजमधील प्रतिष्ठित कुलगुरू व डिन्स एकत्र आले आणि त्यांनी फायनान्स एज्युकेशनच्या भविष्याबाबत चर्चा केली. या इव्हेण्टची प्रमुख सहयोगी डिलॉइट होती. या इव्हेण्टचा शैक्षणिक संस्था व उद्योगामध्ये हरित सहयोगाला चालना देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे विद्यार्थी जगभरात विकसित होत असलेल्या कर्मचारीवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करण्यास आणि अत्याधुनिक शैक्षणिक दृष्टीकोनांचा शोध घेण्यास सक्षम होतील.
फिनटेकसारखे उदयोन्मुख ट्रेण्ड्स आणि एन्व्हायरोन्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स (ईएसजी) तत्त्वांवर लक्ष केंद्रित केलेली ही गोलमेज परिषद फायनान्स एज्युकेशनमधील सर्वांगीणी परिवर्तनाला प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था व उद्योगामधील तज्ञांनी आर्थिक व्यावसायिकांच्या भावी पिढीला भावी जागतिक अर्थव्यवस्थेमधील गुंतागूंतींचे निराकरण करण्यास सक्षम करण्यासाठी सर्वोत्तम मार्गांबाबत चर्चा केली.
झेल एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक प्रथम बरोट म्हणाले, ”झेल एज्युकेशनमध्ये आमचा विश्वास आहे की, फिनटेक व ईएसजीचे भविष्य निपुण प्रमुखांवर अवलंबून आहे, जे या संकल्पनांना शाश्वत व्यवसाय मॉडेल्समध्ये एकीकृत करू शकतात. आमचा विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रायोगिक अध्ययनाद्वारे संपादित केलेल्या व्यावहारिक कौशल्यांसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
उद्योग सहयोगींसोबत सहयोग करत आम्ही शैक्षणिक पाथवेज तयार करत आहोत, जे विद्यार्थ्यांना भावी आर्थिक लँडस्केपमधील गुंतागूंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सक्षम करतील. आमचे क्षमतापूर्ण कर्मचारी असण्यासोबत फायनान्सच्या भविष्याला आकार देण्यास सक्षम असलेले इनोव्हेटिव्ह प्रमुख असलेले व्यावसायिक घडवण्यावर लक्ष केंद्रित आहे.”
माननीय माजी कॅबिनेट मंत्री व कुलगुरू श्री. सुरेश प्रभू यांनी उपस्थिती दाखवून या इव्हेण्टची शोभा वाढवली, तसेच फायनान्स एज्युकेशनबाबत पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सर्वसमावेशक व अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले, ज्यामुळे विशेषत: फिनटेक क्षेत्रात सैद्धांतिक ज्ञान व व्यावहारिक उपयोजनामधील तफावत दूर होईल. श्री. प्रभू यांच्या मते गुंतागूंतीच्या आर्थिक लँडस्केपमधील आव्हानांचे निराकरण करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करणे शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
कृतीशील सोल्यूशन्सना ओळखणे ही या परिषदेची मुख्य थीम होती, जे भविष्यात फायनान्स एज्युकेशनला आकार देतील. शैक्षणिक आराखड्यांना विकसित होत असलेल्या उद्योग गरजांशी एकीकृत करत झेल एज्युकेशन विद्यार्थ्यांना झपाट्याने बदलत असलेल्या व्यावसायिक वातावरणामध्ये प्रगती करण्यास संबंधित कौशल्यांसह सुसज्ज करण्याचा प्रयत्न करत आहे.
या गोलमेज परिषदेमध्ये दोन विचारशील पॅनेल चर्चासत्रांचा देखील समावेश होता. पहिल्या पॅनेलने ईएसजी तत्त्वांमध्ये वाढ आणि भारतीय अर्थव्यवस्थेमधील त्यांच्या वाढत्या महत्त्वाबाबत चर्चा केली. दुसऱ्या पॅनेलने रोजगार संधी निर्माण करण्यामध्ये फिनटेकची वाढती भूमिका, टेक्नोलॉजिकल ऑटोमेशन आणि फायनान्समध्ये मानवी कौशल्याचे अपरिहार्य महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले.