फेस ऑफ इंडिया २०२४ चे यशस्वी आयोजन

भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या फेस ऑफ इंडिया २०२४ चे नुकतेच पुण्यात यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वेस्टिन हॉटेलमध्ये झालेल्या या शानदार कार्यक्रमाने पुण्यातील फॅशन जगतात नवे चैतन्य निर्माण केले आहे. पुणे फॅशन वीकचे दूरदर्शी अध्यक्ष, बादल साबू यांनी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

फेस ऑफ इंडिया हा केवळ फॅशन इव्हेंट नाही, तर ही एक सांस्कृतिक चळवळ आहे जी भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी उंची देते. दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित आशिया मॉडेल फेस्टिव्हलमधील अधिकृत प्रवेशाची संधी म्हणून, हा कार्यक्रम तरुण भारतीय प्रतिभेला भारतीय फॅशनचे सौंदर्य, कलाकुसर आणि नाविन्य दाखवून, जगातील सर्वांत प्रतिष्ठित व्यासपीठावर उतरण्याची आयुष्यात एकदाच संधी देतो. बादल साबूच्या प्रभावी नेतृत्वाखाली, हे ग्लॅमरस व्यासपीठ मॉडेल्स आणि डिझायनर्सना जागतिक स्तरावर आणत असून, फॅशन पॉवरहाऊस म्हणून भारताची प्रतिष्ठा मजबूत करत आहे.

फेस ऑफ इंडिया २०२४ मधील प्रथम क्रमांकाचे विजेते सोमा संहिता आणि हर्षवर्धन सिंग, द्वितीय क्रमांकाचे विजेते समिक्षा कोपरे, विकास सरन, आणि तृतीय स्थान मिळविणारे सीमा दुबे आणि शुभम श्रीवास्तव यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरण्याची संधी मिळणार आहे, दक्षिण कोरियामध्ये त्यांना विशेष संधीं मिळणार आहे. या उगवत्या ताऱ्यांसाठी, फेस ऑफ इंडिया हे उच्चभ्रू जागतिक कार्यक्रम आणि फॅशन वीकसाठी संधी देणारे प्रवेशद्वार असून, जागतिक फॅशन करिअरसाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून या उपक्रमाचा दर्जा अधिक दृढ होत आहे.

फेस ऑफ इंडिया २०२४ मध्ये भारतातील उच्चदर्जाचे डिझायनर येथे एकत्र आले होते. बेस्पोकवालाने पारंपरिक कलात्मकता आणि अत्याधुनिक डिझाइनचा मिलाफ घडवून साकारलेला आकर्षक ड्रेस ग्लॅमरस शोस्टॉपर अभिनेत्री मॉडेल हेमल इंगळेने परिधान करून रॅम्प वॉक केला आणि त्या कलाकृतीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ऑलिव्ह फॅशनने उत्कृष्टपणे तयार केलेल्या निर्मितीनेही प्रेक्षकांना थक्क केले. डी लोअरच्या शाश्वत फॅशनसाठीच्या वचनबद्धतेनेही सर्वांनाच अचंबित केले.

एसडीजीद्वारे सुमित दासगुप्ताने अभिनेता उद्योजक शिवेंद्रसिंग राजपूत आणि मिस्टर महाराष्ट्र जरना संघवी या शोस्टॉपर्स सोबत इको-लक्झरी संकल्पना नव्या उंचीवर नेली, तर आसिफ मर्चंटने आपल्या ग्लॅमरस रेड कार्पेटवरील शोस्टॉपर मिसेस वर्ल्ड (२०२२-२३) सरगम कौशाने परिधान केलेल्या ब्रायडल कॉउचरने सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या.

ग्लॅमरच्या या चमकदार सोहळ्यात बॉलीवूड स्टार सिमरत कौरने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सौंदर्य आणि स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या, सिमरत कौरसह फेस ऑफ इंडिया २०२३ ची विजेती निश्चला धारवा, सुरभी चौतालिया आणि बादल साबू यांनी फेस ऑफ इंडिया २०२४ मध्ये परीक्षक म्हणून काम केले. या सर्वांनी उपस्थित मान्यवर आणि फॅशन आयकॉन्ससोबत आनंद व्यक्त केला आणि ही संध्याकाळ अविस्मरणीय केली.

“आम्ही फक्त भारतीय फॅशन साजरी करत नाही, तर आम्ही ती जागतिक स्तरावर पुन्हा परिभाषित करत आहोत,” असे बादल साबू म्हणाले. पारंपरिक मूल्यांसह आधुनिक डिझाइनचा अनोखा मिलाफ करणारे पुणे फॅशन वीक आणि फेस ऑफ इंडिया हे कार्यक्रम भारतीय संस्कृतीचे दीपस्तंभ म्हणून काम करतात. रिअल इस्टेट आणि फॅशन एकत्र आणण्याची बादलची धाडसी दृष्टी दोन्ही उद्योगांना आकार देत असून, मेरिटेन हाईट्स याचे प्रायोजक म्हणून पुढे आले आहेत.

फेस ऑफ इंडिया २०२४ चे प्रभावशाली, फॅशन प्रेमी आणि इंडस्ट्रीतील दिग्गज सुझलॉनचे राकेश शुक्ला, शारदा ग्रुपच्या मनीषा बोडस आणि संजय कान यांच्यासह अनेक प्रख्यात उद्योजक, मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा चैतन्यदायी झाला होता.