लावा इंटरनॅशनल लिमिटेड या भारतातील आघाडीच्या स्मार्टफोन निर्माता कंपनीने या उत्सवाच्या काळात त्यांचा अत्याधुनिक लावा अग्नी ३ हा उच्च तंत्रज्ञानयुक्त स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होत असल्याचे जाहीर केले.
आजच्या तंत्रज्ञान-समज असलेल्या पिढीसाठी उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करून, रु. १९,९९९* या प्रारंभिक आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. सेगमेंट फर्स्ट ड्युअल एमोलेड डिस्प्ले आणि शक्तीशाली मीडियाटेक डायमेंसिटी ७३००एक्स प्रोसेसर अशा विभागातील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह अग्नी ३ ची रचना करण्यात आली आहे.
मुख्य उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा मिलाफ करून अभूतपूर्व वापरकर्ता अनुभव देऊ करतो. हा स्मार्टफोन ८ जीबी +१२८ जीबी चार्जरशिवाय, ८ जीबी +१२८ जीबी चार्जरसह आणि ८ जीबी+२५६ जीबी चार्जरसह या तीन प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आला आहे. हिथर ग्लास आणि प्रिस्टीन ग्लास या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला असून ९ ऑक्टोबरला रात्री १२ वाजल्यापासून अग्नी ३ विक्रीसाठी उपलब्ध होईल.
लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रॉडक्ट-हेड श्री. सुमित सिंग म्हणाले, “अग्नी 3 श्रेणीची व्याख्या करणाऱ्या नव्या कल्पना आणि उत्कृष्टतेच्या ज्वलंत भावनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हा केवळ एक स्मार्टफोन नाही; तर भारताच्या तंत्रज्ञानविषयक कौशल्याचा आणि भारतात निर्माण करण्यात आलेली अतुलनीय वापरकर्ता अनुभव देऊ करणारी दर्जेदार उत्पादने देण्याच्या आमच्या बांधिलकीची ही साक्ष आहे.
मला आशा आहे की, अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या नव्या श्रेणीसह अग्नीची लोकप्रियता वाढेल आणि या विभागातील स्मार्टफोन अनुभवांची नव्याने व्याख्या तयार केली जाईल.”