- विलीनीकरणात दोन लो-कॉस्ट कॅरियर्समधील ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण, विमाने हस्तांतरित करणे, कामकाजाच्या जोडीलाच सुरक्षा आणि देखभाल मान्यता यांचा समावेश
- एअर इंडिया समूह त्यांच्या ५ वर्षीय AI परिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून चार विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेत
एअर इंडिया समूहाने एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि AIX कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे एअरएशिया इंडिया) यांच्या कामकाज एकत्रीकरण आणि कायदेशीर विलीनीकरणाचे काम पूर्ण करून त्यातून एका मोठ्या लो-कॉस्ट कॅरियरची स्थापना झाली आहे.
विलीनीकरण झालेली संस्था ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ नावाखाली आणि एकत्रित एअरलाइन कोड IX सह कार्यरत राहील. हा एअर इंडिया समूहाच्या परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्यायोगे चार विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्यात येत आहे. जागतिक दर्जाची विमानकंपनी म्हणून उभे राहण्यासाठी हा समूह सध्या विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेत आहे.
विमानकंपनीच्या रीफ्रेश ब्रँडच्या अनावरणानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एअर इंडिया एक्सप्रेससाठीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यात विलीनीकरणासाठी सहाय्यक ठरणाऱ्या ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण आणि एअर ऑपरेटर सर्टिफिकेट्स (AOCs) चे हस्तांतरण समाविष्ट होते. अशा विलीनीकरणाच्या गुंतागुंतीमुळे, या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सोबत जवळून काम करणे आवश्यक होते. या विलीनीकरणाला नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MOCA), नागरी विमान सुरक्षा ब्युरो (BCAS) आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांचे पाठबळ मिळाले.
मंगळवारी, DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त यांनी DGCA मुख्यालय, नवी दिल्ली येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह यांना अद्ययावत AOC सुपूर्द केले. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबत यशस्वी एकत्रीकरण आणि विलीनीकरण हे प्रशंसनीय आहे आणि विमान कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमानवाहतूक बाजारपेठ म्हणून भारताची वेगाने वाटचाल होत असताना एका मजबूत नियामक व्यवस्थेची गरज आहे. या गुंतागुंतींच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण टप्पा साध्य करणे, हे DGCA आणि ऑपरेटर अशा दोघांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतिक आहे.”
DGCA च्या फ्लाइट स्टँडर्ड्स डायरेक्टरेटने तयार केलेल्या लाईव्ह ट्रॅकरसह ही प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी देखरेख ठेवणाऱ्या समर्पित टीमने प्रगतीचा सातत्याने मागोवा घेण्यासाठी वेळेत आव्हानात्मक कार्य पूर्ण करण्यास मदत केली.
एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह म्हणाले, “सुमारे वर्षभरापूर्वी आम्ही AIX कनेक्ट आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही संस्थांना एका सामाईक ब्रँडच्या मागे आणत त्यांच्या एकत्रीकरणास सुरुवात केली. त्याच वेळी, आम्ही आज दोन्ही संस्थांच्या कामकाज आणि कायदेशीर विलीनीकरणात परिणत होणाऱ्या गुंतागुंतीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवर काम केले. DGCA, BCAS, MoCA, AIX आणि ग्रुप लीडरशिप टीम आणि इतर अनेक सहकाऱ्यांमधील सहयोगा या संपूर्ण प्रक्रियेच्या यशात महत्त्वाचा ठरला.”
एअर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबतचे एकत्रीकरण हे एअर इंडियाच्या Vihaan.ai परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विलीनीकरण झालेली संस्था भारताभोवती आणि आजूबाजूच्या प्रदेशात नवीन आणि अधिक आकर्षक मूल्य उत्पादने शोधत असलेल्या विशेषत: देशातील महत्वाकांक्षी तरुण पिढीसाठी हवाई प्रवासाची सेवा देईल. या विलीनीकरणानंतर विस्ताराचे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबर रोजी विलीनीकरण होईल. DGCA च्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहोत.”
विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, एअर इंडिया एक्सप्रेस भविष्यातील विकास आणि परिवर्तनाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करेल. विमानकंपनीच्या विमानांचा ताफा आतापर्यंत ८८ विमानांवर पोहोचला आहे. त्यात दरमहा सुमारे चार नवीन विमानांची भर पडत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस विमानांचा ताफा १०० विमानांचा आकडा ओलांडण्याची अपेक्षा असून विमानकंपनीचे नेटवर्क भारत, आखाती प्रदेश आणि आग्नेय आशिया येथे पसरलेले आहे.
AIX कार्यरत असलेल्या मार्गांची संख्या ७४ वरून १७१ इतकी वाढली आहे आणि टाटा समूहाने २०२२ च्या सुरुवातीला एअर इंडियाचे अधिग्रहण घेतल्यानंतर प्रवासी वाहतुकीत ४००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये, एअरलाईनने एकत्रित ब्रँड ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ चे अनावरण केले. त्यानंतर, AIX कनेक्टद्वारे चालवली जाणारी विमानसेवाही ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ ब्रँड अंतर्गत सुरू असून त्यासाठी आवश्यक नियामक मान्यता घेण्यात आली आहे.