सोनीतर्फे ब्राव्हिया ९ ही आतापर्यंतची सर्वात उठावदार ४के टेलिव्हिजन सीरिज लाँच, प्रेक्षकांना सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभूती देण्यासाठी सज्ज

सोनी इंडियाला ब्राव्हिया ९ ही अद्ययावत, प्रमुख मिनी एलईडी टेलिव्हिजन सीरिज लाँच करताना आनंद होत आहे. एक्सआर बॅकलाइट मास्टर ड्राइव्हने परिपूर्ण असलेली ही टेलिव्हिजन सीरिज उठावदार रंग व गडद काळ्या रंगाची निर्मिती करते, दर्जेदार कॉन्ट्रास्ट आणि सुंदर नैसर्गिक रंगांचीही अनुभूती देते. आधुनिक एआय प्रोसेसर एक्सआरने सुसज्ज असलेली ही अत्याधुनिक टेलिव्हिजन सीरिज जबरदस्त, इमर्सिव्ह अनुभव देण्यासाठी आणि घरगुती मनोरंजन क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.

ब्राव्हिया ९ सीरिज तुम्हाला एखाद्या सीनमध्ये पूर्णपणे बुडून जाण्याचा अनुभव देते, जो सोनीने सिनेमा दिग्दर्शकांसाठी बनवलेल्या व्यावसायिक मॉनिटर्समध्ये वापरण्यात आलेल्या बॅकलाइट कंट्रोल तंत्रज्ञानाप्रमाणे आहे. एक्सआर बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह आपल्या अनोख्या लोकल डिमिंग अल्गोरिदमच्या मदतीने हजारो एलईडीवर अचूक नियंत्रण करते आणि खऱ्या अर्थाने कॉन्ट्रास्टचा अनुभव देते. हे करताना सर्वात आव्हानात्मक सीन्समधील शॅडो डिटेल्सही जतन केले जातात. कल्पाना करा, ब्राव्हिया ९ मधील हाय पीक ल्युमिनान्ससह प्रखर सूर्यप्रकाश, बर्फाने आच्छादलेले लँडस्केप्स कसे दिसतील. यातील असामान्यरीत्या प्रकाशित टेलिव्हिजन्स आणि अद्वितीय ल्युमिनान्स निसर्गाच्या सीन्स सगळ्या तपशिलांसह निर्मिती करत असल्यामुळे अगदी प्रखर सूर्यप्रकाशातही ते पाहता येतील.

नवी ब्राविया ९ सीरिज १८९ सेमी (७५) आणि २१५ सेमी (८५) आकाराच्या स्क्रीन आकारात उपलब्ध करण्यात येणार आहे. ब्राविया ९ सीरिजमधील आधुनिक एआय प्रोसेसरला आवाज आणि दृश्याच्या मानवी आकलनाची समज असल्यामुळे टीव्ही पाहण्याच्या अनुभवात क्रांती येणार आहे. या प्रोसेसरमध्ये सीन रेकग्निशन यंत्रणा देण्यात आली आहे, जी डेटाचे अचूक विश्लेषण करते, चित्र जास्तीतजास्त वास्तववादी दिसेल, याची काळजी घेते व सिनेमा क्रिएटरच्या ध्येयाची पुनर्निमिती करते. त्यातून जबरदस्त कॉन्ट्रास्ट आणि उठावदार रंगांची निर्मिती होत असल्यामुळे सिनेमे, शोज आणि गेम्स जबरदस्त सुस्पष्टता आणि अचूकतेसह पाहता येतात. ब्राविया ९ सीरिज घरगुती मनोरंजनाचा नवा मापदंड प्रस्थापित करत, तुमच्या लिव्हिंग रूमचे सिनेमॅटिक स्वर्गात रुपांतर करण्यासाठी सज्ज आहे.

ब्राव्हिया ९ सीरिजमध्ये स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड देण्यात आला आहे, जो फिल्म क्रिएटर्सना अपेक्षित असलेली दर्जेदार इमेज तुमच्या घरातच मिळवून देतो. त्याशिवाय आधीच प्रस्थापित असलेल्या नेटफ्लिक्स अडॅप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोअर (पूर्वीचे ब्राव्हिया कोअर) यांबरोबर आता प्राइम व्हिडीओ कॅलिब्रेटेड मोड देण्यात आला आहे. या नव्या मोडमध्ये ग्राहकांना दर्जेदार मनोरंजन त्यांच्या क्रिएटर्सना अपेक्षित असल्याप्रमाणे अनुभवण्याचे विविध मार्ग मिळतात. प्रेक्षकांना सिनेमे, सीरिज आणि पहिल्यांदाच लाइव्ह क्रीडा प्रसारणासाठी आपोआप ॲडजस्ट केल्या जाणाऱ्या सर्वोच्च पिक्चर क्वालिटीचा आनंद घेता येतो. ब्राव्हिया ९ सीरिज आयमॅक्स एनहान्स्ड असून, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अटमॉसशी सुसंगत आहे. त्यामुळे असामान्य ब्राइटनेस, शार्प कॉन्स्ट्रास्ट, उठावदार रंग आणि इमर्सिव्ह साउंड यांचा अनुभव घेता येतो. यामुळे डिस्ने+, प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स आणि इतर लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स पाहण्याचा अनुभव उंचावतो.

ब्राव्हिया ९ स्टुडिओ- दर्जाचे मनोरंजन आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या लिव्हिंग रूममध्ये आणणार आहे. डॉल्बी व्हिजनमुळे एचडीआर कंटेंट उंचावतो. आकर्षक रंग, गडद काळ्या छटा आणि हायलाइट्समुळे टीव्ही पाहण्याचा अनुभव आणखी सुखद होतो. डॉल्बी अटमॉसमुळे बहुआयामी ध्वनीचा अनुभव दिला जात असल्यामुळे, तुम्ही त्या सीन्समध्ये पूर्णपणे समरस होऊन जाता.

ब्राव्हिया ९ सीरिजमध्ये सोनी पिक्चर्स या खास प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे, जो सोनी पिक्चर्स सिनेमांचा मोठा संग्रह उपलब्ध करून देतो. या प्लॅटफॉर्ममध्ये ४के एचडीआर आणि आयमॅक्स एनहान्स्ड सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे सिनेमा पाहण्याचा अनुभव दर्जेदार पिक्चर्स व ध्वनीमुळे आणखी सुखद होतो. २४ महिन्यांसाठी १० फ्री क्रेडिट्स मिळतात, ज्यातून आयमॅक्स एन्हान्स्ड व्हिज्युअल्सचे ४के ब्लू- रे दर्जाचे सिनेमे स्ट्रीम करून तुमच्या घरात मोठ्या पडद्याची जादू अनुभवता येते.

ब्राव्हिया ९ सीरिज उच्च दर्जाचा गेमिंग टेलिव्हिजन असून, पीएस5 साठी परफेक्ट आहे. आकर्षक व्हिज्युअल्स व सफाईदार कामगिरीमुळे गेमिंगचा जबरदस्त अनुभव घेता येतो. यात ऑटो एचडीआर टोन मॅपिंग कॉन्ट्रास्ट व नेमक्या रंगांसाठी देण्यात आले आहे, तर ऑटो गेम मोडमुळे लॅग कमीतकमी राहील आणि प्रतिसाद देण्याचा वेग जास्त असेल, याची काळजी घेतली जाते. डार्क शॅडो आणि प्रखर हायलाइट्समध्येही प्रत्येक तपशील व खरे रंग उठून दिसतात. ब्राव्हिया ९ पीएस5 सह आपोआप गेम मोडमध्ये स्विच होत असल्याने लॅग कमी होतो व प्रतिसाद वाढतो. त्यानंतर सिनेमांसाठी ते स्डँडर्ट मोडमध्ये स्विच होते. यामुळे प्रत्येक भावनेसह सीन्स अनुभवता येतात. 4K/120 एफपीएस, व्हेरिएबल रिफ्रेश रेट(व्हीआरआर) आणि ऑटो लो लेटन्सी मोडमुळे (एएलएलएम) जलदपणे गेम खेळण्यासाठी सफाईदार व स्पष्ट हालचाली होतात.

नवीन ब्राव्हिया ९ सीरिजमध्ये वरती अकॉस्टिक मल्टी-ऑडिओ+ बीम ट्विटर आणि बाजूला फ्रेम ट्विटर्स देण्यात आल्यामुळे सिनेमॅटिक सराउंडचा निर्मिती होते. प्रत्येक ध्वनी योग्य प्रकारे वितरित केला जात असल्यामुळे टीव्ही पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होतो.

ब्राव्हिया ९ सीरिजमध्ये गुगल टीव्हीमुळे स्मार्ट युजर एक्सपिरीयन्स मिळतो. यामध्ये ४००,००० सिनेमे आणि टीव्ही एपिसोड्स, तसेच १०,००० अप्स व गेम्स प्रेक्षकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. गुगल टीव्हीद्वारे तुमचा आवडीचा सर्व कंटेंट एकाच ठिकाणी योग्य प्रकारे संघटित केला जात असल्यामुळे आपल्या हवं त्या गोष्टीचा आनंद घेता येतो.

किंमत आणि उपलब्धता
मॉडेल किंमत (रुपये) उपलब्धतेची तारीख
75XR90 449,990/- आता उपलब्ध
85XR90 599,990/- आता उपलब्ध

ही मॉडेल्स सोनीच्या सर्व सेंटर्सवर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्समध्ये आणि ई- कॉमर्स संकेतस्थळांवर भारतात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.