एआयवायएफए स्काय हॉक्सने पटकावले पीडीएफए सुपर डिव्हिजनचे विजेतेपद; सदीमचे सर्वाधिक 17 गोल

फॉर्मात असलेल्या एआयवायएफए स्काय हॉक्सने पीडीएफए सुपर डिव्हिजन लीग 2023-24 चे जेतेपद दिमाखात पटकावले.

गंगा लिजेंड्स, बावधन मैदानावर झालेल्या शेवटच्या लीग सामन्यात रविवारी एआयवायएफएने स्निग्मय एफसीवर 1-0 असा विजय मिळविला. अतिरिक्त वेळेत सदीम मियाने (90+1) केलेला गोल हा एआयवायएफए स्काय हॉक्सला लीगमध्ये अपराजित राखण्यास पुरेसा ठरला.

एआयवायएफए स्काय हॉक्सच्या नावावर 13 सामन्यांनंतर सध्या एकूण विक्रमी 37 गुण आहेत. 12-1-0 (विजय-बरोबरी-पराभव) असा त्यांचा रेकॉर्ड आहे.

सर्वाधिक 17 गोल (13 सामने) करणारा 18 वर्षीय सदीम हा एआयवायएफएच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

दिवसातील अन्य सामन्यांमध्ये केपी इलेव्हनने सांगवी एफसीएवर 6-0 अशी मात केली. अल्फ्रेड नेगल (3 गोल) तसेच एडविन फालेरो, संतोष राठोड, मेलविन फालेरो यांच्या प्रत्येकी एक गोलमुळे त्यांनी प्रतिस्पर्धी टीमला मोठ्या फरकाने पराभूत केले.
त्यांच्या विजयासाठी पुरेसा होता.

AIYFA स्काय हॉक्स

केपी इलेव्हन 14 गुणांसह सध्या नवव्या स्थानावर आहे. सांगवी एफसी 4 गुणांसह तेराव्या स्थानावर आहे.

तिसऱ्या सामन्यात, गेम ऑफ गोल एफसीने श्रीकांत मोलांगइरीच्या (50व्या) एकमेव गोलच्या जोरावर चेतक एफसीचा 1-0 असा पराभव केला. यासह गेम ऑफ गोल एफसीसीने त्यांची गुणसंख्या 20 गुणांवर (12 सामने) नेली. चेतक एफसी 13 गुणांवर (11 सामने) कायम आहे.

आठवड्यातील पहिल्या सामन्यात, संगम यंग बॉईजने स्निग्मय एफसीला 2-1 असे रोखले. स्निग्मय एफसीने पूर्वार्धात अंकुश कुमारच्या (30व्या) गोलद्वारे आघाडी घेतली. तथापि, संगम यंग बॉईजने दमदार पुनरागमन केले. प्रतीक साबळेने (76व्या) त्यांना बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी अक्षय बोरोने (78व्या) केलेला गोल महत्वपूर्ण ठरला.

परशुरामियन्स एससी आणि चेतक एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. गौरव स्वामिनाथनने (५व्या) परशुरामियन्सला लवकर आघाडी मिळवून दिली. चेतक एफसीकडून प्रमोद अत्रेने (८०व्या) बरोबरी साधली.

निकाल:
23/8/24 रोजीचे सामने
परशुरामियन्स एससी: 1(गौरव स्वामीनाथन 5वा) बरोबरी वि. चेतक एफसी: 1 (प्रमोद अत्रे 80वा).

संगम यंग बॉईज: 2(प्रतीक साबळे 76वा, अक्षय बोरो 78वा) विजयी वि. स्निग्मय एफसी: 1 (अंकुश कुमार 30वा).

25/8/24 रोजीचे सामने
केपी इलेव्हन: ६(आल्फ्रेड नेगल ४०वा, ४७वा, ८९वा; एडविन फालेरो ६६वा; संतोष राठोड ६९वा; मेलविन फालेरो ८०वा) विजयी वि. सांगवी एफसीए: ०.

गेम ऑफ गोल एफसी: 1(श्रीकांत मोलानगिरी 50वा) विजयी वि. चेतक एससी: 0

एआयवायएफए स्काय हॉक्स: 1(सदीम मिया 90+1) विजयी वि. स्निग्मय एफसी: 0