पुणे: कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्टस् अकादमीच्या वतीने ‘डिजिटल मीडिया व नवे प्रवाह’ या विषयावर ‘कॅलिडस संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता सावरकर सभागृह, आयएमडीआर, डेक्कन, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. बीबीसी मराठीच्या पत्रकार विशाखा निकम व एबीपी माझाचे पत्रकार निलेश बुधावले यांना ‘कॅलिडस एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक पंकज इंगोले यांनी दिली.
पंकज इंगोले म्हणाले, “सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे व बीबीसी न्यूज मराठीचे संपादक अभिजित कांबळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘डिजिटल मीडिया व नवे प्रवाह’ या विषयावरील चर्चासत्रात पत्रकार व युट्युबर प्रशांत कदम, ‘भाडीपा’च्या सहसंस्थापिका पॉला मॅकग्लीन, ‘आरपार’च्या संस्थापिका अश्विनी तेरणीकर, डिजिटल क्रिएटर अथर्व सुदामे हे सहभागी होणार असून, मित्र म्हणे या युट्युब चॅनेलचे सौमित्र पोटे चर्चासत्राचे संचालन करणार आहेत. यावेळी अकादमीतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला खंडेराय प्रतिष्ठान, उचित मीडिया सर्व्हिसेस, इट्स माय डिझाईन या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.”