- भारताच्या विविध भागात पावसाळा आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत
- प्रत्येक पूरग्रस्त स्कोडा ग्राहकासाठी आपत्कालीन रोड साइड असिस्ट (आरएसए)
- आरएसएचा पर्याय न निवडलेल्या ग्राहकांनाही ही सुविधा लागू
- मोफत आरएसए सहाय्य १५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत उपलब्ध राहणार
- मोफत आरएसएसाठी ग्राहक १८०० २०९ ४६४६ किंवा १८०० १०२ ६४६४ या क्रमांकांवर कॉल करू शकतात.
भारताच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि तीव्र पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्कोडा ऑटो इंडियाने सक्रिय ‘स्कोडा फ्लड रिलीफ सपोर्ट’ उपक्रम अंमलात आणला आहे.
देशभरातील प्रत्येक पूरग्रस्त स्कोडा कारला मदत पुरवली जात आहे. रोड साइड असिस्टन्स अर्थात आरएसएचा पर्याय न निवडणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा दिली जात आहे.
सहाय्य (सपोर्ट)
भारतभरात कोठेही पुराचा सामना करणाऱ्या स्कोडा कार्स आणि ग्राहकांना स्कोडा फ्लड रिलीफ सपोर्ट प्रोग्रॅमद्वारे सक्रिय आरएसए सहाय्य पुरवले जात आहे. ज्यांनी आरएसएचा पर्याय निवडलेला नाही अशा ग्राहकांनाही १५ सप्टेंबर २०२४ या तारखेपर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. सर्व ग्राहक गमनशील राहू शकतील आणि पावसाळ्याच्या ऋतूत कुठे अडकून पडणार नाहीत याची काळजी या सेवेद्वारे घेतली जात आहे.
कंपनीने १८०० २०९ ४६४६ आणि १८०० १०२ ६४६४ हे दोन टोल-फ्री क्रमांक सुरू केले आहेत. या फोन क्रमांकांवर ग्राहक २४ तास संपर्क करू शकतील आणि मदत प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे एकाहून अधिक पर्याय राहतील. स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या सर्व डीलर्सना वाहनाच्या दुरुस्तीसाठी (व्हेइकल फ्लोअर रिपेअर) तज्ज्ञ मार्गदर्शन जारी केले आहे.
सेवा
स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या सर्व नवीन कार्ससाठी नेहमीच ४ वर्षे किंवा १००,००० किलोमीटर्स मर्यादेपर्यंत वॉरंटी देऊ केली आहे, तसेच ही वॉरंटी ५व्या आणि ६व्या वर्षापर्यंत तसेच १५०,००० किलोमीटरपर्यंत वाढवून घेण्याचाही पर्याय ग्राहकांना दिला आहे.
याशिवाय कंपनीच्या ताफ्यातील सर्व गाड्या प्रौढ आणि लहान मुले यांच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या चाचण्या झालेल्या व पंचतारांकित मानांकन असलेल्या आहेत. नवीन फ्लड रिलीफ सपोर्ट म्हणजे आपल्या ग्राहकांना कार बाळगण्याचा व तिची देखभाल करण्याचा विनासायास अनुभव देण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी केलेला आणखी एक प्रयत्न आहे.