पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशन (पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स) या जगातील इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्ड कनेक्टीव्हीटी (आयएफईसी) सोल्यूशन्सच्या आघाडीच्या कंपनीने आज भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्राचे उद्घाटन केले आहे.
१९७९ मध्ये स्थापना करण्यात आलेली पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स सर्वसमावेशक अनुभव देते, जे एअरलाइन्सना त्यांच्या प्रवाशांशी कनेक्ट करत इन-फ्लाइट अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत आणि नवीन युगातील विमान प्रवासासाठी इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्ड कम्युनिकेशन (आयएफईसी) सिस्टम्सच्या मूल्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.
जगातील २०० हून अधिक आघाडीच्या एअरलाइन्सनी त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सचे इन-फ्लाइट एंगेजमेंट, सॅटेलाइट वाय-फाय कनेक्टीव्हीटी आणि डिजिटल सेवा इन्स्टॉल करण्याचे ठरवले आहे.
प्रमुख अतिथी म्हणून माननीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोल यांच्या उपस्थितीत पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सच्या पुण्यातील नवीन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केन सैन आणि पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडिया व साऊथ एशियाचे अध्यक्ष, तसेच पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स इंडियाचे संचालक श्री. मनिष शर्मा यांनी उद्घाटन समारोहामध्ये त्यांचे स्वागत केले.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केन सैन म्हणाले, ”पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स विकसित करणाऱ्या प्रत्येक आयएफईसी सोल्यूशनमध्ये नाविन्यपूर्ण, भविष्य-केंद्रित व प्रमाणित सॉफ्टवेअरला प्राधान्य देते, तसेच डिजिटल चॅनेलची निर्मिती करते, जे आमच्या एअरलाइन ग्राहकांना अधिक कार्यक्षमपणे त्यांच्या प्रवाशांशी संलग्न होण्यास सक्षम करते.”
”सर्वाधिक कुशल इंजीनिअर्स आणि झपाट्याने विकसित होत असलेल्या एव्हिएशन क्षेत्रासह भारत आमच्या व्यवसायाच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याकरिता उत्तम लोकेशन आहे आणि आम्ही पुण्यातील आमच्या नवीन केंद्राच्या माध्यमातून सॉफ्टवेअर इनोव्हेशन व डिझाइन क्षमता वाढवण्यास उत्सुक आहोत.”
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशनचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर सत्येन यादव म्हणाले, ”आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे, जेथे आम्ही एअरलाइन प्रवाशांना वैयक्तिकृत डिजिटल अनुभव देण्याच्या दिशेने प्रवास सुरू करत आहोत. आम्ही अत्याधुनिक सॉफ्टवेअर सोल्यूशन्स वितरित करण्यास उत्सुक आहोत, जे प्रांतातील व जागतिक स्तरावरील ग्राहकांना, तसेच पुण्यातील आमच्या वाढत्या सॉफ्टवेअर टॅलेंटला आनंदित करतील.”
पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडिया व साऊथ एशियाचे अध्यक्ष आणि पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स इंडियाचे संचालक मनिष शर्मा म्हणाले, ”भारत ‘सॉफ्टवेअर टॅलेंटसंदर्भात क्षमतां’शी संलग्न आहे. आज, भारत संपूर्ण जगाला आयटी सपोर्ट व आयटी सेवा देत आहे आणि पॅनासोनिकने जगभरातील इतर उपकंपन्यांना उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी इनोव्हेशन केंद्रे व जागतिक क्षमता केंद्रे स्थापित करण्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सचे पुण्यातील केंद्र भारतातील आमच्या गुंतवणूकांच्या सिरीजमधील नवीन केंद्र आहे आणि आम्ही इन-फ्लाइट एंगजेमेंट अॅण्ड कम्युनिकेशन (आयएफईसी)साठी नाविन्यपूर्ण सोल्यूशन्ससह विविध बाजारपेठा व एअरलाइन्सच्या गरजांची पूर्तता करण्यास उत्सुक आहोत.”
हे नवीन केंद्र आयएफईसी सोल्यूशन्सचा विकास व वितरणाला पाठिंबा देण्याप्रती समर्पित भारतातील पहिले केंद्र आहे. या केंद्रामध्ये उद्घाटनाच्या टप्प्यावर २०० हून अधिक कुशल इंजीनिअर्स कर्मचारी म्हणून काम करत आहेत. तसेच आयएफईसी सोल्यूशन्ससाठी एअरलाइन्सच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याकरिता केंद्रामध्ये सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग टॅलेंट वाढवण्याच्या विकास योजना आहेत, ज्यामुळे एअरलाइन्सना त्यांच्या प्रवाशांना वैयक्तिकृत अनुभव देता येईल.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सचे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्र एअरलाइन्सना सर्वात नाविन्यपूर्ण आयएफईसी सोल्यूशन्सचा वापर करत प्रवाशी डिजिटल सहभाग दृष्टीकोनांची जाणीव करून देण्यास सक्षम करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग आहे. आयएफईसी सोल्यूशन्सना दर्जात्मक एंटरप्राइज सॉफ्टवेअर टूल्सचे पाठबळ आहे, जे सेल्फ-सर्विस असण्यासेाबत आयएफईसी सोल्यूशन लाइफसायकल खर्च कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
सॉफ्टवेअरची श्रेणी केंद्रामधील अत्याधुनिक लॅबोरेटरीजमध्ये विकसित, चाचणी करण्यासोबत टिकवण्यात येईल, ज्यामुळे प्रवाशांना नॅरोबॉंडी व वाइडबॉडी एअरक्राफ्टचा अनुभव मिळण्यासोबत एअरलाइन्सच्या गरजांची पूर्तता होईल. यामध्ये एक्स सिरीज इन-फ्लाइट एंगेजमेंट सिस्टम आणि डिजिटल सोल्यूशन्ससह एअरलाइन इंटरअॅटिव्ह्जचा समावेश आहे, जे एअरलाइन्सना अद्वितीय सीटबॅक प्रवासी अनुभव, एसडीकेच्या (सॉफ्टवेर डेव्हलपमेंट किट्स) माध्यमातून आयएफईसी डेव्हलपमेंट सपोर्ट आणि मोबाइल कम्पॅनियन अॅप्स निर्माण करण्यास सक्षम करतात.
पुण्यातील नवीन केंद्र पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सच्या सॉफ्टवेअर विकास क्षमतांना गती देईल आणि बाजारपेठेत शक्तिशाली, नेक्स्ट जनरेशन आयएफईसी व डिजिटल सोल्यूशन्स सादर करण्यासाठी लागणारा कालावधी सुधारण्यास मदत करेल.
नवीन केंद्राच्या विकासाला गती देण्यासाठी पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स महाराष्ट्र राज्यातील, तसेच भारतभरातील युनिव्हर्सिटीजसोबत सहयोग करत आहे, ज्यामुळे कुशल इंजीनिअरिंग पदवीधर निपुण होण्यासोबत प्रगती करतील.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सचे पुण्यातील नवीन केंद्र भारतातील पॅनासोनिकची नवीन गुंतवणूक आहे. पॅनासोनिकने १९७२ मध्ये भारतातील बाजारपेठेत प्रवेश केला आणि तेव्हापासून कंपनीने प्रबळ कामगिरी करत विकास केला आहे. तसेच, आता पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाशी सामील झाली आहे, जिचे सध्या भारतातील विविध ठिकाणी ११,००० कर्मचारी आहेत.
नवीन केंद्र ‘बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर’ (बीओटी) कार्यसंचालनाच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. हे कार्यसंचालन पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सकडून गुंतवणूकीसह २०२१ मध्ये सुरू झाले आणि कुशल इंजीनिअर्सची टीम तयार केली आहे, जी पुण्यातील कंपनीच्या सॉफ्टवेअर डिझाइन व विकासला अधिक पुढे जाण्यास चालना देईल.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशन बाबत
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशन जगातील इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टम्सची आघाडीची प्रदाता कंपनी आहे. कंपनी १९७९ मध्ये उद्योगात कार्यसंचालनाला सुरूवात केली आणि सतत नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स सादर केले आहेत, जे अद्वितीय ग्राहक अनुभव सक्षम करतात आणि एअरलाइन लॉयल्टी (एनपीएस) सहाय्यक महसूल आणि कार्यरत कार्यक्षमता वाढवतात.
जगातील २०० हून अधिक आघाडीच्या एअरलाइन्सनी त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सचे इन-फ्लाइट एंगेजमेंट, सॅटेलाइट वाय-फाय कनेक्टीव्हीटी आणि डिजिटल सेवा इन्स्टॉल करण्याचे ठरवले आहे.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्सच्या प्रमाणित सिस्टम्सना सर्वात मोठ्या, जागतिक सपोर्ट व सर्विसेस टीमचे पाठबळ आहे, जी सर्वोच्च सिस्टम कार्यक्षमतेच्या खात्रीसाठी ओईएम माहितीचा वापर करत आहे.
पॅनासोनिक अॅव्हीओनिक्स कॉर्पोरेशनचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे, तसेच ३,५०० हून अधिक कर्मचारी आहेत आणि जगभरातील ५० ठिकाणी कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.panasonic.aero