आंतरराष्ट्रीय प्रवासाशी निगडीत असलेल्या पल्मोनरी एम्बोलिझमच्या वाढत्या प्रमाणाबाबत पुण्यातील सह्याद्रि रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

पुणे – जुलै १६२०२४ – गेल्या दोन वर्षांतएक नवीन कल पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आला आहेयेथील डॉक्टर्सना सातत्याने लांब अंतराचे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये पल्मोनरी एम्बोलिझम (PE) चे वाढते प्रमाण दिसून आले आहेनुकत्याच एका 42 वर्षीय रुग्णाला छातीत अस्वस्थता आणि धाप लागण्याची लक्षणे दिसल्यानंतर पीईचे निदान झालेया रुग्णाला उपचार देताना वारंवार आंतरराष्ट्रीय उड्डाणे केल्याने हा त्रास वाढला होता असे निदर्शनास आले.

पल्मोनरी एम्बोलिझम (पीई) म्हणजे एक प्रकारची रक्ताची गुठळी; जी फुफ्फुसातील धमनीमध्ये अडथळे निर्माण करतफुफ्फुसाचा रक्त प्रवाह रोखते. यासंदर्भात माहिती देताना पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समधील इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट, कौरभी झाडे यांनी विमान प्रवासादरम्यान रुग्णांची दीर्घकाळ शारीरिक हालचाल होत नाही ज्यामुळे पीईची जोखीम वाढू शकते यावर भर दिलातसेच चार तासांपेक्षा जास्त वेळाची उड्डाणे असल्यासयात रक्त गोठण्याचा धोका तिप्पट असतोत्याशिवाय प्रामुख्याने बसण्याची जागाडिहायड्रेशन तसेच कमी प्राणवायूची पातळी यामुळे देखील याचा धोका वाढू शकतो असे स्पष्ट केले.

मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीद्वारे पीईच्या 17 रुग्णांवर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार केल्यानंतर हा कल त्यांच्या निदर्शनास आलारक्ताच्या गाठी विरघळवणारी पारंपरिक औषधे अशावेळी फार उपयुक्त ठरत नाहीतहे लक्षात आल्यानंतर रुग्णावर उपचार करण्यासाठी त्यांनी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी हा पर्याय निवडलामेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी या उपचार पद्धतीमध्ये कॅथेटरचा वापर करून एका छोट्या उपकरणाच्या सहाय्याने रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताच्या गुठळ्या काढून टाकल्या जातात. जेव्हा अशा गुठळयांचे प्रमाण जास्त असते किंवा प्रारंभिक वैद्यकीय उपचार अयशस्वी झाल्यावर हिच प्रक्रिया उपयोगी ठरते. जास्त संख्येने गुठळया असल्यास त्याचे जलद व्यवस्थापन हे या उपचारपद्धतीतील प्रमुख आव्हान आहे. मात्र असे असूनही या उपचार पद्धतीचे परिणाम दीर्घकालीन आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे ते जीवनदान देणारे आहेत.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनाने हे निरीक्षण अधोरेखित केले आहे. “Travel-Associated Venous Thromboembolism” नामक या संशोधनाने VTE आणि प्रवासाचा वेळ यांच्यातील संबंध ठळकपणे दाखवला. 4 तासांच्या प्रवासानंतर होणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त दोन तासांच्या प्रवासात या आजाराचा धोका 26% ने वाढतो. व्हीटीईला प्रतिबंध करण्यासाठी, विशेषतः विमान प्रवासादरम्यान, ग्रॅज्युएटेड कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज सारख्या कमी-जोखीम प्रतिबंधक उपायांची व्यवस्था करावी, असे देखील या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

वेगवेगळी आरोग्य पार्श्वभूमी असलेल्या 21 ते 72 वर्षे वयोगटातील रुग्णांचा अभ्यास केला असता, तरुण लोकसंख्येला याचा वाढता धोका आहे असे देखील दिसून आले. पल्मोनरी एम्बोलिझम हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचे तिसरे कारण म्हणून देखील याचा उल्लेख केला जातो. यामुळेच, या आजारावर तत्काळ उपचार महत्त्वाचे असल्याचे डॉ. झाडे यांनी नमूद केले.

सह्याद्रि हॉस्पिटल्सपुणे येथील पल्मोनरी एम्बोलिझम रिस्पॉन्स टीम (पीईआरटीचे प्रमुख डॉकपिल बोरावके यांनी सुट्टीचा हंगाम विचारात घेऊन यासंबंधातील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. “अधिकाधिक लांबच्या हवाई प्रवासाला लोकांचे प्राधान्य असतेमात्र असे प्रवास करत असतानापल्मोनरी एम्बोलिझम सारख्या त्रासांना टाळण्यासाठी काय करावे आणि करू नये याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहेदर अर्ध्या तासाने वेगाने चालणेसतत पाणी पिणे आणि विमान प्रवासादरम्यान मद्य पिणे टाळणे यासारख्या साध्यासोप्या गोष्टी तुम्ही प्रवासा दरम्यान करू शकता आणि हा धोका टाळू शकताअसे डॉबोरावके यांचे म्हणणे आहे.

योग्य वेळी करण्यात आलेले वैद्यकीय हस्तक्षेप, तात्काळ केलेले उपचार, प्रवासाशी संबंधित पीई बद्दल असलेली सतर्कता आणि त्यामुळे निदर्शनास आलेला हा कल या सगळ्यामुळे सह्याद्रि हॉस्पिटल्सची रुग्णांवर उपचार करण्याची वचनबद्धताच अधोरेखित होते. दीर्घकालीन विमान प्रवासामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल रुग्णांना माहिती देत त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी येथील वैद्यकीय पथक प्रयत्नशील आहे.