ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलचे तीन विद्यार्थी नेपाळमध्‍ये आयोजित

पुणे, जुलै २०२४: ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल, सुस रोड कॅम्‍पस्- पुणे येथील विद्यार्थ्‍यांनी नुकतेच गोव्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या ऑल इंडिया वायएसएए नॅशनल लेव्‍हल चॅम्पियनशीप २०२४ मध्‍ये आर्चरी (ति‍रंदाजी) स्‍पर्धेत सहभाग घेतला आणि विजय मिळवला. आयुष शेट्टी, श्रीन नलावडे आणि शौर्य सहस्‍त्रदुत्‍धे यांनी नॅशनल लेव्‍हलमध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी केली, जेथे देशभरातील अॅथलीट्सचा उत्‍स्‍फूर्त सहभाग दिसण्‍यात आला. हे तीन ऑर्किडियन्‍स इंटरनॅशनल आर्चरी चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरले, जी ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये नेपाळ येथे आयोजित करण्‍यात येणार आहे.

इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी आयुष शेट्टीने १० वर्षांखालील मुलांच्‍या श्रेणीमध्‍ये सुवर्ण पदक पटकावले आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थीनी श्रीन नलावडेने १० वर्षांखालील मुलींच्‍या श्रेणीमध्‍ये रौप्‍य पदक जिंकले. इयत्ता आठवीमधील विद्यार्थी शौर्य सहस्‍त्रदुत्‍धेने १४ वर्षांखालील मुलांच्‍या श्रेणीमध्‍ये कांस्‍य पदक पटकावले. नॅशनल लेव्‍हल चॅम्पियनशीपमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रतिनिधीत्‍व करताना या तिघांनी तिरंदाजीमध्‍ये स्‍वत:ची असाधारण कौशल्‍ये दाखवली आणि परीक्षकांनी त्‍यांचे कौतुक केले.

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍स-स्‍पोर्टसच्‍या उपाध्‍यक्ष डॉ. माधुरी सागळे यांनी यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले. तरूण टॅलेंट्सना निपुण करण्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत त्‍या म्‍हणाल्‍या, ”आमचे तरूण तिरंदाज – आयुष, श्रीन आणि शौर्य यांचे नॅशनल लेव्‍हल आर्चरी चॅम्पियनशीपमधील उल्‍लेखनीय कामगिरीसाठी मन:पूर्वक अभिनंदन! ही कामगिरी टॅलेंट, अथक मेहनत आणि योग्‍य मार्गदर्शन एकत्र आल्‍यास मोठे यश गाठता येण्‍याचे आदर्श उदाहरण आहे. आमच्‍या विद्यार्थ्‍यांनी शाळेला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्‍यासोबत त्‍यांच्‍या इतर सहकाऱ्यांना सर्वोत्तमतेसाठी प्रयत्‍न करण्‍यास प्रेरित देखील केले आहे. आम्‍ही त्‍यांच्‍या यशाला साजरे करण्‍यासोबत शिस्‍तबद्धता, अवधान व टीमवर्क अशी आवश्‍यक जीवन कौशल्‍ये विकसित करण्‍यामध्‍ये क्रीडा शिक्षणाच्‍या महत्त्वाला देखील प्राधान्‍य देत आहोत. या कामगिरीमधून तरूण टॅलेंटला निपुण करण्‍यासह राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांसाठी सुसज्‍ज करण्‍यासाठी ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या क्रीडा शिक्षणाची परिणामकारकता दिसून येते. आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या भावी प्रयत्‍नांसाठी साह्य करण्‍यास आणि क्रीडामध्‍ये सर्वोत्तमतेचा वारसा निर्माण करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

विद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत सुस रोड कॅम्‍पसच्‍या मुख्‍याध्‍यापिका रेखा पी. म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला आमच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी कामगिरीचा अभिमान वाटतो आणि आम्‍ही त्‍यांना भावी प्रयत्‍नांमध्‍ये यशस्‍वी होत राहण्‍याच्‍या शुभेच्‍छा देतो. त्‍यांची समर्पितता आणि अथक मेहनत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूलमधील सर्व विद्यार्थ्‍यांसाठी प्रेरणादायी आहे. त्‍यांच्‍या विजयामधून त्‍यांचे टॅलेंट, तसेच ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूलकडून दिले जाणारे प्रखर प्रशिक्षण व पाठिंबा देखील दिसून येतात. आम्‍ही त्‍यांना इंटरनॅशनल लेव्‍हलमध्‍ये यशस्‍वी होत देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्‍यासाठी शुभेच्‍छा देतो.”

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल, सुस रोड कॅप्‍स, पुणे येथील शारीरिक शिक्षणाच्‍या शिक्षिका तृप्‍ती शिंदे यांनी या विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्‍यासोबत मार्गदर्शन केले. तृप्‍ती शिंदे यांच्‍या तिरंदाजीमध्‍ये क्षमता व ज्ञानामुळे त्‍यांना नॅशनल लेव्‍हल आर्चरी चॅम्पियनशीपमध्‍ये उत्तम कामगिरी करता आली.

विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल, सुस रोड कॅम्‍पस्, पुणे येथील शारीरिक शिक्षणाच्‍या शिक्षिका तृप्‍ती शिंदे म्‍हणाल्‍या, ”माझ्या विद्यार्थ्‍यांना नॅशनल लेव्‍हल आर्चरी चॅम्पियनशीपमध्‍ये निपुण कामगिरी करताना पाहण्‍याचा माझ्यासाठी अत्‍यंत अभिमानास्‍पद क्षण आहे. आयुष, श्रीन आणि शौर्य यांनी क्रीडाप्रती मोठी समर्पितता व आवड दाखवली आहे आणि त्‍यांनी मिळवलेल्‍या पदकांमधून त्‍यांची अथक मेहनत दिसून येते. त्‍यांची प्रशिक्षक म्‍हणून त्‍यांना मार्गदर्शन करण्‍याचा आणि त्‍यांचा विकास जवळून पाहण्‍याचा मला आनंद होत आहे. आता, आमचे इंटरनॅशनल चॅम्पियनशीपवर लक्ष केंद्रित आहे आणि आम्‍ही त्‍यांची कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यासाठी व जागतिक मंचाकरिता त्‍यांना सुसज्‍ज करण्‍यासाठी प्रशिक्षण सत्रांमध्‍ये वाढ करणार आहोत.”

ऑर्किडट्स द इंटरनॅशनल स्‍कूलचा सर्वांगीण दृष्टिकोन क्‍लासरूमधील अध्‍ययनाव्‍यतिरिक्‍त इतर क्रियाकलाप प्रदान करत विद्यार्थ्‍यांमध्‍ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. या उल्‍लेखनीय कामगिरीमधून तरूण टॅलेंटला निपुण करण्‍यामध्‍ये शाळेच्‍या क्रीडा अभ्‍यासक्रमाची परिणामकारकता दिसून येते.