TATA SUV Nexon : टाटा मोटर्सने आज भारतात त्यांच्या लोकप्रिय SUV Nexon चे नवीन एंट्री-लेव्हल व्हेरियंट लाँच केले आहेत. यामध्ये पेट्रोल मॉडेलमधील स्मार्ट (ओ) प्रकार आणि डिझेल मॉडेल्समधील स्मार्ट+ आणि स्मार्ट+ एस प्रकारांचा समावेश आहे. नुकत्याच लाँच झालेल्या महिंद्रा XUV 3XO शी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने नेक्सॉनचे नवीन व्हेरियंट सादर केले आहेत.
नवीन स्मार्ट (O) पेट्रोलची किंमत 7.99 लाख रुपये आहे, तर डिझेल इंजिन पर्यायासह स्मार्ट+ ची किंमत 9.99 लाख रुपये आहे आणि स्मार्ट+ S ची किंमत 10.59 लाख रुपये आहे (सर्व किंमती, एक्स-शोरूम).
यामुळे ही कार बरीच किफायतशीर झाली आहे. मागील स्मार्टच्या तुलनेत बेस पेट्रोल व्हेरिएंट 15,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर स्मार्ट+ 30,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि स्मार्ट+ S व्हेरियंट 40,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याच वेळी, कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 14.74 लाख रुपये आहे. त्यासोबतच कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन आणि 6 एअरबॅग्ज सारखी फिचर्सदेखील उपलब्ध असतील.