पुणे ३ मे २०२४ : फोनपे नेआज नेपाळमधल्या काठमांडू येथील आयोजित एका विशेष कार्यक्रमात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित असलेल्या आपल्या सेवा सादर केल्या आहेत. या कार्यक्रमाने बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, पेमेंट सिस्टम प्रदाते, युपीआय स्वीकारणारे व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह नेपाळच्या आर्थिक क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणले. या कार्यक्रमाला नेपाळमधील सर्वात मोठ्या पेमेंट सिस्टम ऑपरेटर फोनपे पेमेंट सर्व्हिस लिमिटेडचा सपोर्ट होता. ही एनआयपीएल ची समकक्ष कंपनी देखील आहे.
सदरील कार्यक्रमात पॅनल चर्चा संपन्न झाली . पॅनेल चर्चेत सीमापार देयके आणि नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर आणि आर्थिक क्षेत्रावर होणारे परिणाम तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार सुलभ करण्यासाठी नियामक अडथळे आणि मान्य मागण्यांशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण केले. पॅनेलच्या सदस्यांनी नेपाळच्या पर्यटन क्षेत्रावरील युपीआय चा सकारात्मक प्रभावही अधोरेखित केला, विशेषतः सोयीस्कर कॅशलेस पेमेंटद्वारे एकूण पर्यटन अनुभव वाढवून. सीमापार पेमेंट्सचा महसूल प्रवाह आणि वित्तीय संस्थांच्या व्यवसाय मॉडेलवर कसा परिणाम होतो हे मुद्दे या चर्चेत पुढे आले. याशिवाय पॅनेल सदस्यांनी नेपाळमधील ग्राहकांच्या अनुभवावर युपीआयचा प्रभाव कसा आहे हे पाहिले, सोयी, आंतरकार्यक्षमता, सुरक्षा, आणि खर्चाची प्रभाविता यासारख्या घटकांवर लक्ष केंद्रित केले. शेवटी, संभाषण पर्यायी पेमेंट पद्धतींद्वारे सीमापार पेमेंट्सच्या व्यापक आर्थिक परिणामांबद्दल जाणून घेण्यात आले ज्यामध्ये अल्प आणि मध्यम उद्योजकांवर परिणाम होतो.
फोनपेचे आंतरराष्ट्रीय पेमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी , रितेश पै म्हणाले, “नेपाळमध्ये युपीआय द्वारे समर्थित सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या मेळाव्याने नेपाळच्या आर्थिक क्षेत्रातील प्रमुख प्लेअर्सना एकत्र आणले आहे, यात फोनपे सारख्या व्यवसायातील अग्रेसर आणि हॉस्पिटॅलिटी व पर्यटनातील प्रतिनिधी कंपनीचा समावेश आहे. नेपाळमध्ये युपीआय च्या यशाची खात्री करण्याच्या सहयोगी भावनेचा हा पुरावा आहे.आज त्यांच्या उपस्थिती आणि सहभागाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
फोनेपे नेपाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवास कुमार म्हणाले की, “फोनपे पेमेंट सर्व्हिस लिमिटेडसाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. नेपाळमध्ये सीमापार पेमेंट आणण्याचा आमचा४ वर्षांचा प्रवास अखेर यशस्वी झाला आहे आणि युपीआय पेमेंट थेट नेपाळमध्ये आले आहे. आम्ही एनपीसीआय इंटरनॅशनलच्या भागीदारीत युपीआय पेमेंट्स सादर करत आहोत आणि नेपाळमध्ये फोनपे चे स्वागत करत आहोत, आम्हाला असे भविष्य दिसत आहे जिथे सुरळीत डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक वाढ आणि आर्थिक समावेशनाला चालना मिळेल, ज्यामुळे व्यापारी आणि व्यवसायांना फायदा होईल.