पुणे, महाराष्ट्र – एप्रिल, २०२४: कोरेगाव पार्कमध्ये असलेले, पुण्यातील प्रीमियर लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा मॉलने मुलांसाठी ब्रिक्स अँड ब्लॉक्स समर वर्कशॉप आयोजित केले आहे. ४ ते १० वर्षे वयोगटातील मुले या वर्कशॉपमध्ये भाग घेऊन लेगोच्या अद्भुत जगात मौजमस्ती करत सर्जनशीलता व कौशल्य विकास यांना पुढे नेऊ शकतील. १९ ते २८ एप्रिल २०२४ पर्यंत (फक्त शुक्रवार-रविवार) दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुले या वर्कशॉपचा आनंद घेऊ शकतील.
वर्कशॉपमध्ये लेगो®शी संबंधित वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, टीम-बिल्डिंगचे उपक्रम आणि कौशल्य विकासाची आव्हाने असतील. मनोरंजन आणि शिक्षण यांची सांगड असणे महत्त्वाचे असे मानणारे पालक यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना उत्कृष्ट ऍक्टिव्हिटी मिळाली म्हणून नक्कीच खुश होतील. उन्हापासून बचाव तर होईलच शिवाय मनोरंजन व शिक्षण अशी जंगी मजा मुलांना करता येईल.
वर्कशॉपमध्ये मुले लेगो® बिल्डिंगच्या अनेक रोचक संकल्पनांची मजा घेऊ शकतील, यामध्ये स्पेस एक्स्प्लोरेशन, ओशन लाईफ, जंगल ऍडव्हेंचर, पार्टीसाठी कपकेक, ड्रीम कार डिझाईन आणि फ्यूचरिस्टिक रोबोट यांचा समावेश आहे. मुलांचे पालक याठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या लेगो® इन्स्टॉलेशन्सची मजा घेऊ शकतील. यामध्ये हॅरी पॉटर कॅसल, ताज महल, लंडनचा टॉवर ब्रिज, मोटर-ड्रिव्हन रोलर कोस्टर आणि एफसी बार्सिलोनाचे कॅम्प नोउ स्टेडियम यांचा देखील समावेश आहे.
या वर्कशॉपमध्ये मुलांना खूप मजा येईल, तसेच त्यांची सर्जनशीलता, समीक्षात्मक विचार आणि समस्या निवारणाची कौशल्ये यांना देखील आनंददायी वातावरणात प्रोत्साहन मिळेल. मुलांसाठी लेगो® एक फन ऍक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे त्यांच्यातील नैपुण्ये व सर्जनशीलतेला चालना मिळते. मुलांची कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि समस्या निवारणाची कौशल्ये यांना प्रोत्साहन देण्यात लेगो®चे योगदान पालकांना नक्कीच आवडेल.
कोपा मॉलमध्ये अतिशय नाममात्र फी भरून ब्रिक्स अँड ब्लॉक्स समर वर्कशॉपमध्ये तुमच्या मुलांमधील गुणांना चालना मिळू द्या आणि तुमच्या बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा द्या.
अस्वीकारार्ह बाब: लेगो® आणि डुप्लो® हे लेगो® ग्रुप ऑफ कंपनीजचे रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत, जे या कार्यक्रमांना प्रायोजित, अधिकृत किंवा एन्डोर्स करत नाहीत.