रुबी हॉल क्लिनिकमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे सांधेबदल शस्त्रक्रिया सुविधा सुरू

By: Editor_Manas

On: Monday, November 23, 2026 4:25 PM

Google News
Follow Us
पुणे, नोव्हेंबर : रुबी हॉल क्लिनिकच्या वानोव्री येथील रुग्णालयात जॉन्सन अँड जॉन्सन मेडटेकच्या सहकार्याने रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित सांधेबदल शस्त्रक्रिया सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये VELYS™ रोबोटिक-असिस्टेड सोल्यूशनचा वापर केला जाणार असून, त्यामुळे पुणे आणि परिसरातील रुग्णांना आधुनिक व अधिक अचूक गुडघेबदल शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या सुविधेचे उद्घाटन रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय विश्वस्त आणि मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. के. ग्रांट तसेच फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रांट यांच्या उपस्थितीत झाले.

भारतात गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रमाण वाढत असून, लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के नागरिकांना या समस्येचा त्रास असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. २०२३ मध्ये देशातील ५० वर्षांवरील सुमारे ४.७७ कोटी नागरिकांना गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होता. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख गुडघेबदल शस्त्रक्रिया केल्या जातात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचारांची गरज अधोरेखित होत आहे.

VELYS™ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीररचनेनुसार शस्त्रक्रियेचे वैयक्तिक नियोजन करता येते. यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी सीटी स्कॅनची आवश्यकता नसून साध्या एक्स-रेच्या आधारे नियोजन करता येते. शस्त्रक्रियेदरम्यान सर्जनला रिअल-टाइम माहिती आणि मार्गदर्शन मिळते. त्यामुळे इम्प्लांटचे योग्य संरेखन आणि फिटिंग साध्य करण्यास मदत होते. शस्त्रक्रियेचे अंतिम निर्णय मात्र सर्जनच्या वैद्यकीय ज्ञान आणि अनुभवावर आधारित असतात.

डॉ. पी. के. ग्रांट म्हणाले, रुग्णांना आपल्या शहरातच आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हे रुग्णालयाचे ध्येय आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सर्जनना अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया करण्यास मदत होईल.

डॉ. सायमन ग्रांट यांनी सांगितले की, सांध्यांच्या वेदनांमुळे रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. या सुविधेमुळे पुणे आणि परिसरातील रुग्णांना दर्जेदार अस्थिरोग उपचारांचा आधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहे.

या सुविधेमुळे रुबी हॉल क्लिनिकच्या अस्थिरोग उपचारसेवांना नवी दिशा मिळणार असून, रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 23, 2026

November 23, 2026

November 23, 2026

November 23, 2026

November 23, 2026

November 23, 2026