बजाज लाइफ इन्शुरन्सकडून भारतातील विकसित होणाऱ्या विकास संधींचा लाभ घेण्यासाठी प्युअर स्टॉक इनोव्हेशन फंड लाँच

By: Editor_Manas

On: Wednesday, November 18, 2026 4:16 PM

Google News
Follow Us

मुंबई, नोव्हेंबर २०२६: बजाज लाइफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने आज बजाज लाइफ प्युअर स्टॉक इनोव्हेशन फंडच्या लाँचची घोषणा केली. हा इक्विटी आहे, जो नाविन्यता निर्माण करणाऱ्या, स्वीकारणाऱ्या किंवा त्यातून लाभ मिळवणाऱ्या मूलभूतदृष्ट्या प्रबळ भारतीय व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल. हा न्यू फंड ऑफर (एनएफओ) १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू झाला आहे आणि २७ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद होईल. बजाज लाइफच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे (यूएलआयपी) उपलब्ध असलेला हा फंड ग्राहकांना जीवन विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासोबत बाजारपेठ-संलग्न वाढीमध्ये सहभागी होण्याची संधी देतो. हा फंड निफ्टी ५०० इंडेक्सशी संलग्न (बेंचमार्क) आहे.

विद्यमान प्युअर स्टॉक फंडाच्या २० वर्षांच्या गुंतवणुकीच्या यशस्वी कामगिरीवर आधारित असलेला प्युअर स्टॉक इनोव्हेशन फंड ग्रोथ अॅट अ रिझनेबल प्राइस (जीएआरपी) या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे पालन करतो, तसेच नाविन्यतावर आधारित संधी ओळखण्यावर यात विशेष भर दिला जाईल. प्युअर स्टॉकच्या नियमांनुसार हा फंड जुगार, स्पर्धा, मद्य, मनोरंजन, हॉटेल्स आणि तंबाखू व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार नाही. उत्पादने, प्रक्रिया, तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि व्यवसाय मॉडेल्समध्ये नाविन्यता निर्माण करणाऱ्या, स्वीकारणाऱ्या किंवा त्यांचा लाभ घेणाऱ्या व्यवसायांचे यात मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनामध्ये नाविन्यतेची व्यावसायिक व्यवहार्यता, ग्राहकांकडून होणारा स्वीकार, विस्तारक्षमता आणि कंपनीची स्पर्धात्मक आघाडी टिकवून ठेवण्याची क्षमता यांचा विचार केला जाईल.

हा फंड मार्केट-कॅप निरपेक्ष (मार्केट-कॅप अॅग्नॉस्टिक) दृष्टिकोनाचा अवलंब करून लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. फंडाची समभाग निवड प्रक्रिया ७०० हून अधिक गुंतवणूकयोग्य कंपन्यांमधून बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने ३० ते ४० उच्च-विश्वासार्ह समभागांचा केंद्रित पोर्टफोलिओ तयार करेल. ही निवड व्यवसायाची मूलभूत तत्त्वे, आर्थिक प्रबळता, वाढीच्या शक्यता आणि मूल्यांकन यांवर आधारित असेल.

या फंडाच्या लाँचबाबत मत व्यक्त करत बजाज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तरुण चुघ म्हणाले, “भारताची विकास गाथा सर्वच उद्योगांमध्ये नवीन संधी निर्माण करत आहे आणि नाविन्यता यातील महत्त्वाचा प्रेरक घटक म्हणून उदयास येत आहे. प्युअर स्टॉक इनोव्हेशन फंडाच्या माध्यमातून प्रबळ मूलभूत तत्त्वे आणि शाश्वत वाढीची क्षमता असलेले व्यवसाय ओळखण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून भारताच्या विकास गाथेत सहभागी होण्याची संधी मिळेल.”

प्युअर स्टॉक इनोव्हेशन फंडाच्या लाँचसह बजाज लाइफ इन्शुरन्सने आपल्या यूएलआयपी फंड पर्यायांच्या श्रेणीचा आणखी विस्तार केला आहे. तसेच, ग्राहकांना त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात मदत करताना भारताच्या विकसित होणाऱ्या विकास स्थितीशी सुसंगत गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 18, 2026

November 18, 2026

November 18, 2026

November 17, 2026

November 17, 2026

November 17, 2026