पुणे, भारत – ऑक्टोबर ०९, २०२६: KONE या लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज पुण्यामध्ये भारतातील पहिल्या KONE डिजिटल एक्सपिरियन्स सेंटरचे (डीईसी) उद्घाटन केले. हा टप्पा KONE च्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील आणि तंत्रज्ञान, डेटा व नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याप्रतीच्या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा ठरला आहे. या केंद्राचे उद्घाटन KONE कॉर्पोरेशनचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअर जुस्सी हेरलिन, KONE चे प्रेसिडेंट आणि सीईओ फिलिप डेलॉर्म यांच्यासह इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि बोर्डाचे चेअरमन नंदन निलेकणी यांच्या हस्ते करण्यात आले.
KONE डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर ग्राहकांसाठी सर्वसमावेशक केंद्र आहे, जिथे ग्राहक पिपल फ्लो™ आणि स्मार्ट इमारतींचे भविष्य घडवणाऱ्या डिजिटल क्षमता पाहू शकतात, अनुभवू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात. डिजिटलायझेशन, कनेक्टिव्हिटी, एआय आणि डेटा-आधारित अंतर्दृष्टी संपूर्ण इमारतीच्या जीवनचक्रात कसे मूल्य निर्माण करू शकतात, हे दाखवण्यासाठी हे केंद्र KONE च्या व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याला एकत्र आणते.
ग्राहकांच्या अनुभवाभोवती डिझाइन केलेले हे केंद्र डिझाइन आणि कॉन्फिगरेशन, उत्पादन अनुभव व डिजिटल इंटरफेस, ग्राहक जीवनचक्राची पारदर्शकता आणि रिअल-टाइम सेवा माहिती या सर्व परस्परसंवादी अनुभवांना एकत्र आणते. इमारतीच्या जीवनचक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर डिजिटल तंत्रज्ञान अधिक चांगले निर्णय घेण्यास, अधिक पारदर्शकता आणण्यास आणि सक्रिय सेवा व्यवस्थापनास मदत करू शकते, याचा अनुभव ग्राहक येथे घेऊ शकतात.
या अनुभवाच्या केंद्रस्थानी असलेला KONE स्टुडिओ ग्राहकांना डिजिटल पद्धतीने लिफ्टचे सोल्यूशन्स एक्सप्लोर आणि कॉन्फिगर करण्यास सक्षम करतो, तर MyKONE संपूर्ण ग्राहक जीवनचक्रादरम्यान प्रोजेक्ट, उपकरणे आणि सेवांची माहिती प्रदान करते. ई-लिंकउपकरणांची स्थिती आणि कामकाजाबाबत रिअल-टाइम माहिती देते, ज्यामुळे सक्रिय व्यवस्थापनास मदत होते, तसेच ग्राहक-केंद्रितसर्व्हिस डॅशबोर्ड प्रमुख सेवा आणि कामकाजाशी संबंधित माहिती एकत्र आणून उपकरणांच्या कामगिरीची एकत्रित माहिती ग्राहकांना देतो. एकत्रितपणे हे अनुभव डिझाइनपासून निर्णय प्रक्रियेपर्यंत डिजिटल सोल्यूशन्स अधिक कनेक्टेड आणि प्रतिसाद देणारा ग्राहक अनुभव निर्माण करू शकतात, हे स्पष्ट करतात.
KONE कॉर्पोरेशनचे प्रेसिडेंट आणि सीईओ फिलिप डेलॉर्म म्हणाले:
“भारतात डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर प्रत्यक्ष साकार होताना पाहणे अत्यंत आनंददायी आहे. देशातील लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगातील अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असल्याने, हे केंद्र आमच्या ग्राहकांना डिजिटलायझेशन, कनेक्टिव्हिटी आणि एआय पिपल फ्लोच्या घडवत असलेल्या भविष्याचा अनुभव घेण्याची संधी देते. KONE साठी भारत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि हे केंद्र नाविन्यता आमच्या ग्राहकांच्या अधिक जवळ आणते.”
KONE इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित गोसाईं म्हणाले:
“भारतात आज KONE च्या डिजिटल एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन आमच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील आणि तंत्रज्ञान, डेटा व नावीन्यपूर्णतेच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या आमच्या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्पा आहे. इमारतीच्या संपूर्ण जीवनचक्रात डिजिटल तंत्रज्ञान मूल्य निर्माण करू शकते, ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी हे केंद्र देते. KONE साठी हा महत्त्वाचा टप्पा गाठताना आज आम्हाला आमच्यासोबत जुस्सी हेरलिन, फिलिप डेलॉर्म आणि नंदन निलेकणी उपस्थित असल्याचा खूप आनंद होत आहे. इमारती अधिकाधिक जोडल्या जात आहेत, तसतसे डेटा, एआय आणि डिजिटल नाविन्यतेचा वापर करून इमारतींना अधिक प्रतिसादक, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्यावर आमचा भर आहे.”
हे डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर KONE चा डिजिटल दृष्टिकोन प्रत्यक्षात आणते, तसेच तंत्रज्ञान, डेटा आणि एआय कनेक्टेड इमारतींचे आणि पिपल फ्लो™ चे भविष्य घडवत आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव ग्राहकांना प्रदान करते.





