सणांच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत इंडिया यामाहा मोटरने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर्स आणि मोटरसायकल्सच्या संपूर्ण श्रेणीवर आकर्षक विमा लाभ, लवचिक फायनान्स योजना आणि विशेष मालकीहक्कांचे फायदे देणाऱ्या या मोहिमेचे उद्दिष्ट यामाहाची खरेदी अधिक सुलभ व फायदेशीर बनवणे आहे. या सणासुदीच्या फायद्यांच्या माध्यमातून, ग्राहकांच्या खरेदी प्रवासात अधिक मूल्य जोडणे आणि एका सुरळीत व उत्साही मालकीच्या अनुभवासह उत्सवाचा आनंद वाढवणे हे यामाहाचे उद्दिष्ट आहे.
| प्रकार | उत्पादन/व्हेरिएंट्स | विमा लाभ* | लो डाऊन पेमेंट* |
| यामाहा हायब्रिड स्कूटर रेंज | · Fascino 125
· RayZR 125 |
₹3,399/- | ₹2,499/- |
| यामाहा एफझेड सिरीज | · FZ-S (FZ-S Fi Hybrid, FZ-S Fi, FZ-S Fi V4 DLX and FZ-S Fi V4) · FZ (FZ Rave, FZ-Fi, and FZ Blue Flex) |
₹5,999/- | ₹3,900/- |
| यामाहा १५५सीसी मोटरसायकल्स | · XSR155 | ₹5,555/- | ₹4,999/- |
| · R15
· MT15 |
– | ₹4,999/- |
या मर्यादित कालावधीच्या फेस्टिव्ह ऑफर्स अधिकृत यामाहा डीलरशिप्सवर संपूर्ण भारतात (तामिळनाडू आणि केरळ राज्ये वगळता) उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांना स्टायलिश, स्पोर्टी आणि आकर्षक यामाहा उत्पादने घरी आणून सणासुदीचा काळ साजरा करण्याची आणि हा उत्सव अधिक संस्मरणीय बनवण्याची उत्तम संधी मिळत आहे.





