थर्मेक्सकडून बॉयलर इंडिया २०२६ मध्ये इंटेलिजेंट बॉयलर्स आणि हीटर्सची नवी श्रेणी थर्मेक्स-आय सिरीज लाँच

By: Editor_Manas

On: Thursday, October 8, 2026 4:16 PM

Google News
Follow Us

नवी मुंबई, ऑक्टोबर ८, २०२६: थर्मेक्स या ऊर्जा परिवर्तनातील विश्वासार्ह भागीदार आणि ऊर्जा व पर्यावरणविषयक सोल्यूशन्सच्या आघाडीच्या पुरवठादार कंपनीने आज बॉयलर इंडिया २०२६ मध्ये इंटेलिजेंट बॉयलर्स आणि हीटर्सची नवी श्रेणी ‘थर्मेक्स-आय सिरीज’च्या लाँचची घोषणा केली. ही सिरीज बदलत्या ऑपरेटिंग परिस्थितीनुसार हीटिंग उपकरणांची कामगिरी सतत ऑप्टिमाइझ करते.

या सिरीजमधील पहिले उत्पादन ‘अल्ट्रापॅक-आय’ इंटेलिजेंट बायोमास-फायर्ड बॉयलर आहे, जे इंधनाची वैशिष्ट्ये, सभोवतालची परिस्थिती आणि प्रक्रियेच्या मागणीतील बदलांचा आधीच अंदाज घेते, तसेच बॉयलरची कार्यक्षमता सुधारण्यासाठी रिअल टाइम स्वयंचलितपणे सुधारात्मक उपाययोजना करते. यामुळे प्रतिक्रियाशील दृष्टिकोनाकडून सक्रिय दृष्टिकोनाकडे मोठे स्थित्यंतर घडून येते.

जागतिक स्तरावर उद्योगातील पहिली नाविन्यपूर्ण संकल्पना अल्ट्रापॅक-आय थर्मेक्सचे प्रोप्रायटरी फिजिक्स-एन्हान्स्ड, डेटा-चालित कंट्रोल तंत्रज्ञान ‘एज कंट्रोल’द्वारे समर्थित आहे. प्रायोगिक तत्त्वावरील इन्स्टॉलेशन्समध्ये १० टक्‍क्‍यांपर्यंत इंधन बचत दिसून आली आहे, ज्यामुळे उद्योगांना ऑपरेटिंग खर्च आणि संबंधित कार्बन उत्सर्जनात घट करण्याची उत्तम संधी मिळते.

नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये संपूर्ण कालावधीत अल्ट्रापॅक-आय बॉयलर थर्मेक्सच्या बूथवर प्रदर्शनासाठी उपलब्ध असेल.

एज कंट्रोल योग्य विद्यमान बॉयलर्स आणि इतर उपकरणांसाठी रेट्रोफिट सोल्यूशन म्हणूनही दिले जाऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना आपली सध्याची उपकरणे न बदलता विद्यमान असेट्समध्ये इंटेलिजेंट नियंत्रण आणि ऑप्टिमायझेशन आणणे शक्य होईल.

“गेल्या सहा दशकांपासून थर्मेक्सने उद्योग क्षेत्रात उष्णता कशी निर्माण केली जाते आणि उष्णतेचा वापर कसा होतो, हे सुधारण्यासाठी सातत्याने काम केले आहे. आमची इंटेलिजेंट बॉयलर्सची सिरीज त्या प्रवासातील पुढचे स्थित्यंतर दर्शवते, ज्यामध्ये कम्बशन (ज्वलन) आणि बॉयलर्सविषयी आमच्या ज्ञानाचे संयोजन प्रगत अॅनालिटिक्स आणि इंटेलिजेंट नियंत्रणासोबत करण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीचा आधीच अंदाज घेऊन स्वतःला ऑप्टिमाइझ करण्याची बॉयलरची ही क्षमता विशेषतः बायोमाससारख्या इंधनांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मूल्य निर्माण करू शकते. हा एक क्रांतिकारी टप्पा असून थर्मेक्स आणि आमच्या ग्राहकांसाठी पुढे टाकलेले उत्साहवर्धक पाऊल आहे. आम्ही थर्मेक्स-आय सिरीजची सुरुवात बॉयलर्स व हीटर्सपासून करत आहोत आणि हळूहळू या इंटेलिजेंट क्षमतांचा विस्तार आमच्या व्यापक पोर्टफोलिओमध्ये करणार आहोत,” असे थर्मेक्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आशिष भंडारी म्हणाले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now