टाटा टेली बिझनेस सर्व्हिसे; सायबर सुरक्षा गुंतवणुकीत पश्चिम भारत देशात अग्रेसर

By: Editor_Manas

On: Thursday, October 1, 2026 3:36 PM

Google News
Follow Us

मुंबई, सप्टेंबर २०२६: टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (TTBS) आणि सायबरमीडिया रिसर्च (CMR) यांनी मिळून केलेल्या ‘एसएमई डिजिटल इन्साइट्स २०२६: सायबरसिक्युरिटी’ या ताज्या अभ्यासानुसार, पश्चिम भारत हा देशात सायबर सुरक्षेवरील गुंतवणुकीत एक प्रमुख बाजारपेठ म्हणून समोर येत आहे. या भागातील लघु आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञानावरील आपल्या मोठ्या खर्चाचा वापर आता नेटवर्कची देखरेख, प्रशासन आणि तज्ञांच्या  मार्गदर्शनासाठी करत आहेत.

पश्चिम भारतातील ५६% लघु आणि मध्यम उद्योग आता त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा ६ ते १०% हिस्सा माहिती तंत्रज्ञानावर खर्च करत आहेत. विशेष म्हणजे, या बजेटमधील ४५% हिस्सा कंपन्या केवळ सायबर सुरक्षेसाठी बाजूला ठेवत आहेत. देशातील इतर कोणत्याही क्षेत्राच्या तुलनेत सुरक्षेसाठीची ही सर्वात मोठी कटिबद्धता आहे. ही मजबूत आर्थिक गुंतवणूक या क्षेत्राला भविष्यात सायबर हल्ल्यांविरोधात अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्यास मदत करत आहे.

या अभ्यासात असेही समोर आले आहे की, पश्चिम भारतातील ५५% लघु आणि मध्यम उद्योजक त्यांच्या सुरक्षिततेचे व्यवस्थापन करण्यासाठी बाहेरील विशेषज्ञ तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय, येत्या वर्षात ५१% कंपन्यांनी आपली सुरक्षा देखरेख आणि ४५% कंपन्यांनी नियमांचे पालन अधिक मजबूत करण्याचे ठरवले आहे. हा अभ्यास अधोरेखित करतो की, प्रभावी सायबर सुरक्षा लागू करताना ‘तज्ञ कौशल्यांची कमतरता’ ही कंपन्यांसमोरील सर्वात मोठी अडचण आहे (सुमारे ४५% एसएमईंनी ही अडचण बोलून दाखवली). म्हणूनच तज्ञांची मदत घेण्याची पश्चिम भारताची (५५%) तयारी ही सुरक्षिततेतील ही त्रुटी वेगाने भरून काढण्यासाठी योग्य पाऊल ठरत आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट मन्नू सिंह या निष्कर्षांवर बोलताना म्हणाले, “पश्चिम भारतातील लघु आणि मध्यम उद्योग आपले व्यवसाय सुरक्षित आणि डिजिटल बनवण्यासाठी अत्यंत गंभीर आहेत. आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत; कारण ते दाखवतात की कंपन्या केवळ तंत्रज्ञानावर पैसे खर्च करत नसून कामकाजातील शिस्तीलाही महत्त्व देत आहेत. व्यवसाय डिजिटल होत असताना, सायबर सुरक्षेला रोजच्या कामकाजाचा अनिवार्य भाग बनवण्याची ही उत्तम संधी आहे. ‘टीटीबीएस’मध्ये आमचे उद्दिष्ट या कंपन्यांना मदत करणे आहे, जेणेकरून ते या गतीचा फायदा घेऊन अधिक सुरक्षितता, मजबूती आणि नवीन आत्मविश्वासाने प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात पाऊल टाकू शकतील. ‘सायबरमीडिया रिसर्च’सोबत मिळून आम्ही कंपन्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करत आहोत, जेणेकरून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यावहारिक आणि ठोस पावले उचलण्यास मदत होईल.”

सायबरमीडिया रिसर्चचे व्हाइस प्रेसिडेंट – इंडस्ट्री रिसर्च ग्रुप, प्रभू राम म्हणाले, “आमचे निष्कर्ष भारतीय लघु आणि मध्यम उद्योजकांच्या सायबर सुरक्षेच्या प्रवासातील एका मोठ्या बदलाच्या टप्प्याकडे बोट दाखवतात. एकीकडे सुरक्षेवर खर्च करण्याची तयारी झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षातील सायबर सज्जता मात्र अजूनही सर्व ठिकाणी सारखी नाही. उदाहरणार्थ, केवळ १२% एसएमई त्यांच्या सायबर सुरक्षा नेटवर्कची सतत देखरेख करतात. अनेक कंपन्या अजूनही विखुरलेल्या सुरक्षा व्यवस्थांवर आणि संकट आल्यावर उपाय शोधण्यावर अवलंबून आहेत. खर्च करण्याची इच्छा आणि प्रत्यक्षातील तयारी यामधील हे अंतर हीच आज भारतीय लघु आणि मध्यम उद्योजकांसमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. सायबरमीडिया रिसर्चमधील आमच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, लघु आणि मध्यम उद्योगांची सायबर सुरक्षा क्षमता आता एकीकृत आणि सातत्याने व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रणालींवर अवलंबून असेल—आणि हा बदल आमच्या अभ्यासात समाविष्ट असलेल्या अनेक प्रगल्भ कंपन्यांमध्ये आत्तापासूनच दिसू लागला आहे.”

या अभ्यासात असेही समोर आले आहे की, सामान्यतः ४६% लघु आणि मध्यम उद्योजक आपल्या माहिती तंत्रज्ञानावरील बजेटमधील ५% पेक्षा कमी हिस्सा सायबर सुरक्षेवर खर्च करतात. याउलट, सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर किंवा हाय-इंटेंट असलेल्या कंपन्यांद्वारे केला जाणारा जास्त खर्च हे दर्शवतो की, गुंतवणूक करण्याची इच्छा आणि आधीपासूनच तयार असलेली मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणा यांच्यात थेट संबंध आहे. यावरून असा संकेत मिळतो की, येत्या काळात सायबर सुरक्षेवर होणारी गुंतवणूक ही केवळ तात्कालिक धोके किंवा सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी असणार नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेला आणखी मजबूत करणे हा त्यामागील मुख्य उद्देश असेल.

या पार्श्वभूमीवर, सायबर सुरक्षेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिकाही वाढताना दिसत आहे. जवळपास ३५% एसएमई एआयला एक उपयुक्त साधन मानतात, जे धोके वेगाने ओळखू शकते आणि मानवी देखरेखीचे काम ऑटोमॅटिक करू शकते. तर दुसरीकडे, ३४% कंपन्यांना भीती आहे की येत्या १२ ते २४ महिन्यांत एआय-आधारित सायबर धोके त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम करू शकतात. हे निष्कर्ष दर्शवतात की, लघु आणि मध्यम उद्योगांकडे सातत्याने व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रणालींसोबतच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची एक उत्तम संधी आहे; जेणेकरून ते आपली सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करू शकतील आणि वेगाने बदलणाऱ्या सायबर धोक्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहू शकतील.

‘एसएमई डिजिटल इन्साइट्स’ अभ्यासाचे मुख्य निष्कर्ष

सायबर सुरक्षा गुंतवणुकीत मोठ्या वाढीचे संकेत

  • ८४% भारतीय लघु आणि मध्यम उद्योजक येत्या १२ ते २४ महिन्यांत सायबर सुरक्षेवरील आपली गुंतवणूक वाढवण्याची योजना आखत आहेत. यावरून असे दिसून येते की, कंपन्या आता याकडे केवळ एक तांत्रिक गरज म्हणून नव्हे, तर व्यवसायाची मुख्य प्राथमिकता म्हणून पाहत आहेत.
  • ८९% मध्यम आकाराचे उद्योग गुंतवणूक वाढवण्याच्या बाबतीत सर्वात पुढे असून ते या बदलाचे नेतृत्व करत आहेत.
  • ४६% एसएमई अजूनही त्यांच्या एकूण आयटी बजेटपैकी ५% पेक्षा कमी हिस्सा सायबर सुरक्षेवर खर्च करतात; जे हे दर्शवते की सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी अजूनही खूप वाव आहे.

सुरक्षेसाठी विश्वासू आणि तज्ञ भागीदारांना प्राधान्य

  • ४८% एसएमई सायबर सुरक्षा भागीदार निवडताना या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देतात की, त्यांचे तंत्रज्ञान सध्याच्या प्रणालीत सहज समाविष्ट करता यावे आणि त्यांचा कस्टमर सपोर्ट उत्तम असावा.
  • ४६% कंपन्या परस्पर विश्वास आणि दीर्घकालीन व्यावसायिक संबंधांना प्राधान्य देतात.
  • ४५% कंपन्या मजबूत सुरक्षा क्षमता आणि नियमांचे काटेकोर पालन याला सर्वात महत्त्वाचे मानतात.

सुरक्षा बळकट करण्याच्या प्रयत्नांमुळे बदलत आहे सायबर सुरक्षेची वास्तविक तयारी

  • ४०% एसएमईंनी गेल्या २४ महिन्यांत कोणत्या ना कोणत्या सायबर हल्ल्याचा किंवा
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now