फोर्स मोटर्सकडून नवीन अर्बेनिया डिलक्स दाखल

By: Abhi

On: Thursday, July 23, 2026 5:04 PM

फोर्स मोटर्स
Google News
Follow Us

फोर्स मोटर्स कंपनीने आज नवीन अर्बेनिया डिलक्स पुण्यासह देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये दाखल केली. ही व्हेईकल तिच्‍या नेक्स्ट-जनरेशन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मची नवीन प्रीमियम उत्पादन श्रेणी आहे. अर्बेनिया प्लॅटफॉर्मच्या यशावर आधारित नवीन अर्बेनिया डिलक्स अधिक उत्कृष्ट प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. भारतातील पहिले पूर्णपणे पायाभूत मोड्यूलर मोनोकॉक व्हॅन प्लॅटफॉर्म म्हणून लाँच केलेल्या अर्बेनियाने प्रीमियम सामायिक प्रवासी वाहतुकीमध्ये नवीन मापदंड निर्माण केला.

नवीन अर्बेनिया डिलक्स तीन व्हीलबेसेस आणि ९+डी ते १६+डी सीटींग कॉन्फिग्युरेशन्ससह आठ सीटींग लेआउट्समध्ये संपूर्ण भारतातील फोर्स मोटर्सच्या डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असेल. या वेईकलची सुरुवातीची किंमत २८.७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

नव्या वाहनात प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सुधारित कामगिरी, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या लाँचसह, नवीन अर्बेनिया डिलक्स सध्याच्या पिढीतील अर्बेनियाची जागा घेईल आणि प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात फोर्स मोटर्सचे मानक उत्पादन बनेल.

नवीन अर्बेनिया डिलक्सच्या लाँचबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले,“नवीन अर्बेनिया डिलक्सच्या लाँचसह आम्ही ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म सुधारित कार्यक्षमता, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवीन स्तरावर घेऊन जात आहोत. प्रीमियम मोबिलिटी क्षेत्र सातत्याने विकसित होत असताना आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय, सुरक्षितता व कामगिरी यामध्ये नवीन मावदंड निर्माण करणारे मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

नवीन अर्बेनिया डिलक्स तीन व्हीलबेसेस आणि ९+डी ते १६+डी सीटींग कॉन्फिग्युरेशन्ससह आठ सीटींग लेआउट्समध्ये संपूर्ण भारतातील फोर्स मोटर्सच्या डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असेल. या वेईकलची सुरुवातीची किंमत २८.७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

————-

गाडीचे स्पेसिफिकेशन्स…

इंजिन

नवीन अर्बेनिया डिलक्सला अधिक शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनची ताकद देण्यात आली आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क प्रदान करते. यामुळे सुधारित पिकअप, सुलभ कामगिरी आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीमसह व्यापकपणे अपग्रेड करण्‍यात आले आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांच्या उत्तम सोयीसह उत्कृष्ट प्रवास वातावरण तयार होते.

सुरक्षितता

नवीन अर्बेनिया डिलक्समध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे, प्रत्येक प्रवाशासाठी कारसारखे ३-पॉइंट सीट बेल्ट्स दिले आहेत. यासोबत ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल (ईटीडीसी) यांचा समावेश आहे, जे प्रवाशांना अधिक सुरक्षिततेची खात्री देतात.

स्मार्ट डिव्हाईसेसचा समावेश

ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक उत्‍साहवर्धक करण्यासाठी वेईकलची रिअल-टाइम माहिती देणारे टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन व ऑफलाइन नेव्हिगेशन, एचडी रिव्हर्स कॅमेरा, व्हॉइस अलर्ट्स व हँड्स-फ्री ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा असलेली कस्टमाइज्ड २३ सेमी (९-इंच) एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

नवीन १६-इंच अलॉय व्हील्स नवीन अर्बेनिया डिलक्सला रस्त्यावर प्रीमियम लूक देतात, तर पॉवरवर चालणारी स्लायडिंग फूटस्टेप प्रवाशांना सहजपणे आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मदत करते. प्रवासाचा प्रीमियम अनुभव पुढे नेण्यासाठी यात ८-स्पीकर डिजिटल थिएटर सिस्टम (डीटीएस) आणि सर्व सीट्सच्या रांगेत स्मार्टफोन सहज चार्ज करण्यासाठी इल्यूमिनेटेड यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट्स आहेत.

नवीन अर्बेनिया डिलक्सला फोर्स केअरचे पाठबळ आहे, ज्यामध्ये फोर्स मोटर्सचे प्रगत आय-पल्स टेलिमॅटिक्स प्लॅटफॉर्म, ५ वर्षे किंवा ५ लाख किमी वॉरंटी, सर्व सेन्सर्सवर ३ वर्षांची वॉरंटी आणि ३ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) सुविधा समाविष्ट आहे, जी मालकीच्या संपूर्ण अनुभवादरम्यान मन:शांतीची खात्री देते.

प्रमुख नवीन वैशिष्ट्ये

  • सुधारित पिकअप आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी शक्तिशाली १०० किलोवॅट मर्सिडीजआधारित डिझेल इंजिन.
  • प्रवाशांच्या उत्तम सोयीसाठी लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि वूडफिनिश फ्लोअरिंगसह नवीन प्रीमियम इंटीरिअर थीम.
  • अधिक सुरक्षिततेकरिता प्रत्येक प्रवाशासाठी कारसारखे पॉइंट सीट बेल्ट्स.
  • वेईकलची रिअल-टाइम माहिती, अलर्ट्स आणि ड्रायव्हर असिस्टण्‍ससाठी टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
  • स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, त्वरित नेव्हिगेशन आणि इंटेलिजण्‍ट ड्रायव्हर असिस्टण्‍ससाठी कस्टमाइज्ड २३ सेमी (इंच) एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
  • सहजपणे आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पॉवर स्लायडिंग फूटस्टेप.
  • प्रीमियम स्टायलिंगसाठी नवीन १६इंच अलॉय व्हील्स.
  • उत्तम मनोरंजन अनुभवासाठी प्रीमियम स्पीकर डिजिटल थिएटर सिस्टम (डीटीएस).

Abhi

Abhi quietly focused, effortlessly real. Building his own path, one step at a time. ✨
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 23, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 20, 2026