छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री विष्णूदेव साय

By: Editor _2

On: Thursday, July 23, 2026 8:43 AM

Google News
Follow Us
सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांच्या दर्शनासाठीही मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आश्‍वासन!
रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील विविध तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या आणि पौराणिक स्थळे येथील आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे अन् वास्तूंचे भावी पिढ्यांसाठी जतन होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार ‘सनातन संस्थे’ला सर्वतोपरी साहाय्य करेल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांनी दिले.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नुकतीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक वारशांच्या जतनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे भाविकांना दर्शन घडवणार
एक सहस्र वर्षांपूर्वी गझनीच्या महमूदाने ऐतिहासिक सोरटी सोमनाथ शिवलिंगाचा विध्वंस केला होता; मात्र सुदैवाने या शिवलिंगाचे दिव्यांश आजही सुरक्षित आहेत. विशिष्ट चुंबकीय तत्त्व असलेल्या या सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे छत्तीसगडमधील भाविकांनाही दर्शन घेता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या अभियानांतर्गत राज्यात विशेष आयोजन करण्याच्या संदर्भातही मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सनातनच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
या विशेष भेटीदरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे देशभरात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म हिताचे कार्य, तसेच गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या विविध उपक्रमांची अत्यंत आस्थेने माहिती जाणून घेतली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रताप जूदेव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अधिवक्ता आशिष शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीचे छत्तीसगड येथील सर्वश्री कमल विश्वास, आशिष परेडा, रोहितसिंग तिरंगा, हेमंत कानसकर आणि नीरज क्षीरसागर उपस्थित होते.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 20, 2026

July 19, 2026