आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे.
बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत.
“ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील,” असे बालसुब्रमण्यन म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे.
बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.





