पुणे : शहरातील खरेदीप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी असून, फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्सने ‘फिनिक्स शॉपिंग फेस्टिव्हल 2026’ची घोषणा केली आहे. जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ग्राहकांना आकर्षक ऑफर्ससह तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
विमाननगर येथील फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्समध्ये होणारा हा महोत्सव पुण्यातील सर्वात मोठ्या शॉपिंग सेलिब्रेशनपैकी एक मानला जात आहे. फॅशन, लाइफस्टाइल, डायनिंग आणि मनोरंजनाचा संगम असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना खरेदीसोबतच विविध बक्षिसांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फेस्टिव्हलदरम्यान 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागी ग्राहकांना दररोज आणि दर आठवड्याला विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. याशिवाय, महोत्सवातील सर्वात मोठे आकर्षण म्हणून टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder) ही कार बंपर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्समध्ये झारा, एच अँड एम, अरमानी एक्सचेंज, लाइफस्टाइल, डिझेल, जीएएस, लॅकोस्ट आणि स्कॉच अँड सोडा यांसारख्या 300 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उपस्थिती आहे. फेस्टिव्हलदरम्यान सहभागी ब्रँड्सवर 50 टक्क्यांपर्यंत सवलतीही देण्यात येणार आहेत.
आयोजकांच्या माहितीनुसार, पुण्यासह आसपासच्या शहरांतील ग्राहकांना एक वेगळा आणि लाभदायी शॉपिंग अनुभव देण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे. आकर्षक ऑफर्स, बक्षिसे आणि प्रीमियम ब्रँड्समुळे हा फेस्टिव्हल खरेदीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.





