राष्ट्रीय, मार्च २०२४ – सत्तरीमधले एक गृहस्थ (वय वर्षे ७२) आणि त्यांची ६३ वर्षीय पत्नी दोघांनाही अंधुक दृष्टीचा त्रास होत होता आणि प्रकाश आणि एकदम चमकता उजेड यासाठी त्यांचे डोळे संवेदनशील होते. त्यांची दृष्टी धूसर होती आणि ते स्पष्टपणे पाहू शकत नव्हते.
पती-पत्नी दोघांनाही काहीही वाचणे कठीण जात होते आणि रात्रीच्या वेळी तर स्पष्टपणे दिसत देखील नव्हते. त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.
अशा वेळी केअरबडी कशा पद्धतीने पुढे आणि आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी असलेला ध्यास कसा दाखवला?
अर्पण लुईटेल नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्जरी केअरसह केअरबडी म्हणून मेडी बडी मध्ये नियुक्त झाले, “सुरुवातीला, पतीने माझ्याशी म्हणजेच त्यांच्या केअरबडी – अर्पणशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या पत्नीच्या आरोग्याच्या स्थितीचे कळकळीने वर्णन केले. मी तातडीने त्यांच्या पत्नीसाठी पुण्यातील प्रतिष्ठित नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अगरवाल नेत्र रूग्णालय यांच्याशी सल्लामसलत भेट घडवून आणली. त्यांच्या प्रकृतीचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विलंब न लावता मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्याची शिफारस केली. रुग्ण आणि तिचे पती शस्त्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेण्यावर ठाम होते.
केअरबडी या नात्याने, मी मेडीबडी कशा प्रकारे शस्त्रक्रिया विनाअडथळा सुलभ करू शकते आणि विमा प्रक्रिया पार पाडू शकते हे त्यांना स्पष्ट करून सांगितले. शस्त्रक्रियेसाठी पुढे जाताना त्यांना संपूर्ण खात्री आणि आत्मविश्वास वाटेल याची मी खूप काळजी घेतली. मी त्यांच्या हितासाठीच काम करेन हे जाणून त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
रूग्णाच्या मुलीने, टिसीएस मध्ये नोकरी करत असताना विचारपूर्वक तिच्या कॉर्पोरेट विमा योजनेत तिच्या दोन्ही पालकांचा लाभार्थी म्हणून समावेश केला होता. मी परिश्रमपूर्वक रुग्णाकडून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली. त्यांची विमा पात्रता निश्चित करण्यासाठी ही गोष्ट अपरिहार्य होती. रुग्णाला सर्व समर्पक तपशिलांचे सर्वसमावेशक खर्चाचे विघटन समजावून सांगण्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. रुग्णाला सर्वोत्तम उपचार आणि शस्त्रक्रिया आरोग्य सेवा सुविधा पुरविण्याच्या माझ्या बांधिलकीसह मी त्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या डॉ अगरवाल नेत्र रुग्णालयात जाण्याची शिफारस केली. शस्त्रक्रियेच्या दिवशी आम्ही कॅब बुकिंग करून देत त्या व्यवस्थितपणे रुग्णालयात पोहोचण्याची व्यवस्था केली. सुमारे एक तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सुमारे 3 आठवड्यांनंतर, रुग्णाच्या पतीने त्यांच्या बिघडत चाललेल्या दृष्टीबद्दल काळजी व्यक्त करत आमच्याशी संपर्क साधला. शस्त्रक्रिया आवश्यक आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यांनी व्यवस्थित निदान होण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर मग रुग्णाने डॉ अगरवाल नेत्र रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाला (OPD) भेट दिली आणि त्यानंतर त्यांच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या जोडप्याच्या या संपूर्ण आव्हानात्मक प्रवासात, दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्याशी सतत संवादसंपर्क साधून होतो.”
हे कथन वैद्यकीय कौशल्य आणि सहवेदना आणि त्या संदर्भातील आरोग्य सेवा यांच्या एकत्रित प्रभावाची पावती आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींना जीवनातील आनंद पुन्हा शोधण्याचा मार्ग मोकळा झाला. पतीने संपूर्ण मेडीबडी टीमबद्दल प्रचंड समाधान व्यक्त करत मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या संपूर्ण प्रवासात त्यांनी दाखविलेल्या अतूट पाठिंब्याचे आणि सर्वांगीण काळजीचे कौतुक केले.
त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे तर, “मी या संधीचा वापर करून घेत मेडीबडीने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचे कौतुक करतो. संपूर्ण भारतातील लोकांना त्यांच्या कामाचा फायदा होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, उच्च दर्जाची आरोग्यसेवा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.”