सनोफी इंडिया लिमिटेड आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्स यांनी सनोफीच्या कार्डिओव्हॅस्क्युल ब्रँड्सची पोहोच वाढवण्यासाठी केली विशेष वितरण भागीदारीची घोषणा

मुंबई, मार्च 2024 – सनोफी इंडिया लिमिटेडच्या  (“SIL”) संचालक मंडळाने आज एक विशेष वितरण आणि प्रसार कराराला मंजुरी दिला.  एसआयएल आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (“Emcure”) यांच्यात एसआयएलचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी उत्पादने भारतात पोहोचवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. हा करार तातडीने लागू करण्यात आला आहे.

कंपनीच्या कार्डिओव्हस्कुलर (CV) श्रेणीतील उत्पादनांचे वितरण आणि प्रचार एमक्युअर फार्मास्युटिकल्स करेल यात Cardace®, Clexane®, Targocid®, Lasix® आणि Lasilactone® सारख्या सुस्थापित ब्रँडचा समावेश आहे.

भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सनोफीच्या प्लांट्समध्ये एसआयएल या ब्रँडची मालकी, आयात आणि उत्पादन सुरू ठेवत असताना, एमक्युअर आरोग्यसेवा व्यावसायिकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि भारतातील सर्व भागात ज्या रुग्णांना त्यांची गरज आहे, अशा रुग्णांसाठी या उपचारात्मक उत्पादनांची  पोहोच वाढवण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करेल.

सनोफी इंडियाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना एमक्युअर येथे काम करण्याची संधी मिळेल.