‘आयसीएमएआय’ पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए राहुल चिंचोळकर

By: Editor_Manas

On: Monday, June 1, 2026 5:18 PM

Google News
Follow Us

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए राहुल चिंचोळकर यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी सीएमए हिमांशू दवे, सचिवपदी सीएमए तनुजा मंत्रवादी, तर खजिनदारपदी सीएमए अमेय टिकले यांची निवड झाली आहे.

२०२६-२७ या वर्षाकरिता नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सीएमए निलेश केकाण, सीएमए नागेश भागणे, सीएमए अनुजा दाभाडे आणि सीएमए निखिल अगरवाल यांचा समावेश आहे. यावेळी ‘आयसीएमएआय’च्या विभागीय समितीचे सदस्य सीएमए चैतन्य मोहरीर, ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए डॉ. एन. के. निमकर, सीएमए अभय देवधर, सीएमए प्रमोद दुबे, सीएमए प्रसाद जोशी, सीएमए मीना वैद्य आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘आयसीएमएआय’ पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानून सीएमए राहुल चिंचोळकर म्हणाले, “ संस्थेच्या ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आणखीन चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. वाणिज्य किंवा इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध करून देणारी ही संस्था आहे. गेल्या सात दशकांची उज्ज्वल परंपरा असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करणे हा आनंदाचा क्षण आहे. राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने माझ्या परीने शक्य तितके योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आगामी वर्षात विद्यार्थी व सदस्यांसाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, एआय व अन्य प्रगत अभ्यासक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.”

सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सीएमए हिमांशू दवे, सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए अमेय टिकले यांनीही निवडीबद्दल आनंद व्यक्त करत मनोगत मांडले. डॉ. संजय भार्गवे यांनी मार्गदर्शन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now