निवंगुणे यांनी स्वीकारला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार

By: Editor_Manas

On: Monday, June 1, 2026 4:56 PM

Google News
Follow Us

पुणे: पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) लहू अण्णा निवंगुणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. काँग्रेसभवन येथे रविवारी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, निखिल कवीश्वर, आकाश मोरे, संभाराजे जगताप, साहेबराव फडतरे, विरधवल गाडे, वैभव बुरंगुले, प्रदीप मेहकरे, संकेत गवरी यांच्यासह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी काळातील काँग्रेस पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी, जिल्ह्यातील राजकीय रणनीती तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत लहू निवंगुणे म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य, शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सद्यस्थितीत काँग्रेसला कोणी मोठा नेता नसला किंवा पक्षाची ताकद थोडी कमी असली, तरी सर्वसामान्य कार्यकर्ता काँग्रेससोबत कायम आहे. या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर ग्रामीण भागात काँग्रेसला सक्षम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. २०२९ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करून पक्ष वाढवणार आहोत.”

शिवराज मोरे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनेत कार्यकर्ता ते वरिष्ठ पदाधिकारी म्हणून निवंगुणे यांनी उत्तम कार्य केले आहे. सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असून, पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांची निवड उपयुक्त ठरेल. याआधीही त्यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now