पुणे : JEE Advanced 2026 परीक्षेत बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) ने पुन्हा एकदा उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेचा विद्यार्थी आदित्य ठाकूर याने अखिल भारतीय क्रमवारीत (AIR) 162 वा क्रमांक मिळवत BT मधील सर्वोच्च मानांकन पटकावले. तर सिद्धार्थ आठल्ये याने AIR 185 मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.
याशिवाय सृजल भुते (AIR 218), आदी महाजन (AIR 253) आणि अवनीश खोलकर (AIR 359) यांनीही अखिल भारतीय टॉप 400 मध्ये स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या चार विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पुणे रँक 2, 3, 4 आणि 5 मिळवली.
संस्थेच्या माहितीनुसार, यंदा BT च्या 14 विद्यार्थ्यांनी AIR टॉप 1000 मध्ये, 67 विद्यार्थ्यांनी AIR टॉप 4000 मध्ये, तर तब्बल 145 विद्यार्थ्यांनी AIR टॉप 10000 मध्ये स्थान मिळवले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करण्याचे काम सुरू असून संपूर्ण निकाल लवकरच संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
टॉप 1000, टॉप 3000, टॉप 5000, टॉप 10000 तसेच एकूण यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत यंदाही पुण्यातील इतर संस्थांच्या तुलनेत BT ने सर्वोत्तम कामगिरी केल्याचा दावा संस्थेने केला आहे.
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले, “दरवर्षी हे निकाल पाहताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते. हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे, पालकांच्या विश्वासाचे आणि शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.”
संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता, प्रभावी समस्या निराकरण कौशल्ये आणि मानसिक स्थैर्य विकसित करण्यावर सातत्याने भर दिल्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. अनुभवी शिक्षकवर्ग, अभ्यासपूर्ण अध्ययन साहित्य, नियमित चाचण्या, प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण आणि वैयक्तिक शंका निरसन सत्रे ही BT च्या प्रशिक्षण व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे संस्थेने नमूद केले.
बाकलीवाल ट्युटोरियल्सने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





