हडपसरमधील अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसेनेचा तुफान हल्लाबोल; शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट

By: Editor_Pratik

On: Sunday, May 31, 2026 11:26 AM

Google News
Follow Us

पुणे : पुणे शहरातील विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने हडपसर परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेत धडक कारवाई केली. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या मागील परिसर तसेच साठे वस्ती येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर थेट धाड टाकून मोठा साठा उद्ध्वस्त केला.

या कारवाईदरम्यान शिवसैनिकांनी हातभट्ट्या फोडून टाकत शेकडो लिटर बनावट गावठी दारू नष्ट केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अवैध दारूचे धंदे सर्वसामान्य नागरिकांना सहज दिसतात, मग ते पोलिसांना का दिसत नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

भानगिरे यांनी आरोप केला की, शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विषारी दारूमुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाने याबाबत अधिक प्रभावी कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हडपसर परिसरात अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात शिवसेना सातत्याने आवाज उठवत आहे. विषारी दारूकांडानंतरही काही भागांत अवैध दारू विक्री सुरू असल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, यापुढे अशा प्रकारच्या धंद्यांविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला.

या धडक कारवाईवेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 31, 2026

May 31, 2026

May 30, 2026

May 30, 2026

May 29, 2026

May 29, 2026