आरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठक

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 3:12 PM

Google News
Follow Us

पुणे: रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) दरवाढीच्या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर आणि पुणे आरएमसी असोसिएशन यांच्यात संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम आणि उद्योगासमोरील अडचणी यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर आणि पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली यांनी चर्चेचे नेतृत्व केले. या बैठकीला ‘बीएआय’चे माजी उपाध्यक्ष डॉ. आर. बी. कृष्णानी, माजी राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाल्हेकर यांनी आरएमसी प्लांटसमोरील अडचणी मांडल्या. तसेच संघटनेची भूमिकाही स्पष्ट केली. आरएमसी उद्योगाला बीएआय पुणे सेंटरकडून पुढील काळातही सहकार्य राहील, अशी ग्वाही देताना अलीकडील आरएमसी दरवाढीबाबत संतुलित आणि संयमित भूमिका घेण्याची विनंती अजय गुजर यांनी केली. या दरवाढीचा बांधकाम क्षेत्र, तसेच सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांवर परिणाम होत असल्याचे ‘बीएआय’तर्फे नमूद करण्यात आले.

यावेळी पुणे आरएमसी असोसिएशनने उद्योगासमोरील कार्यात्मक आणि नियामक अडचणींचा आढावा मांडला. तसेच सर्व संबंधित घटकांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आरएमसी दरांचे योग्य नियमन करण्यासाठी बीएआय पुणे सेंटरने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उद्योगाच्या मागण्या मांडाव्यात, अशी विनंतीही संघटनेतर्फे करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी बांधकाम क्षेत्राच्या वतीने बीएआय पुणे सेंटरने आरएमसी दरवाढीचा पुनर्विचार करून दरांचे सुसूत्रीकरण करण्याबाबतचे निवेदन सादर केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now