पुणे मार्च २०२४: भारताच्या काही अग्रगण्य बिस्कीट ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या ब्रिटानिया मारी गोल्डने हर स्टोर या महिला उद्योजकांसाठीच्या एका आगळ्यावेगळ्या डिजिटल परिसंस्थेचा शुभारंभ केला. भारतातील सर्व महिला उद्योजकांना त्यांच्या वाटचालीमध्ये सातत्याने पाठबळ पुरविणारा एक मंच मिळवून देण्याच्या दृष्टीने हरस्टोर ची रचना करण्यात आली आहे. “साथ जुडो, साथ उडो” ही या उपक्रमाची टॅगलाइन महिलांसाठी एक आश्वासक डिजिटल परिसंस्था विकसित करण्याप्रती ब्रॅण्डने जपलेल्या बांधिलकीचे मूलतत्व नेमकेपणाने मांडते. ही एक अशी परिसंस्था असेल जिथे या ‘विमेनप्रेन्युअर्स’ अर्थात महिला उद्योगकांना एकजुटीने उभे राहता येईल, एकमेकींच्या सोबतीन उन्नती साधता येईल व त्यायोगे अधिक काही साध्य करता येईल.
ब्रिटानिया मारी गोल्डच्या पाठबळाने सुरू करण्यात आलेल्या हर स्टोर ने संपूर्णपणे महिलांच्या मालकीची उत्पादने आणि सेवा दोहोंनाही सूचीबद्ध करणाऱ्या एका अनोख्या बाजारपेठेची सुरुवात करत या उपक्रमाला आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने नेले आहे. डिजिटल बाजारपेठेच्या जगामध्ये आपली भरभराट साधण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि ज्ञान यांनी महिला उद्योजकांना सुसज्ज करण्यासाठी या मंचावर लवकरच सर्वसमावेशक प्रशिक्षण संच, कार्यशाळा आणि कौशल्यवृद्धीचे धडे देणारे व्हीडिओज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विमेनप्रेन्युअर्सना आपापसात ज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी व मार्गदर्शन मिळणे शक्य व्हावे यासाठी तयार केलेल्या एका कम्युनिटीची जोडही या मंचाला लाभणार आहे.
आपल्या उद्योजकतेच्या क्षेत्रातील वाटचालीचा प्रारंभ करताना येणाऱ्या वित्तपुरवठ्याशी संबंधित अडथळ्यांना दूर करण्यासाठी व आपल्या व्यवसायासाठी आवश्यक ती कौशल्ये प्राप्त करण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्याच्या हेतूने २०१९ साली या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हरस्टोर हा भारतीय ग्राहकांसाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उत्पादने आणि सेवा दोन्हींची सूची पुरविणारा आणि ० टक्के कमिशन पद्धतीवर चालणारा एक आगळावेगळा मंच आहे. हा मंच लवकरच हिंदी, कन्नड, बंगाली, तमिळ आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. सध्या ५० हून अधिक व्यवसाय हरस्टोर बाजारपेठेमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहेत.
या मंच सुरू होण्याविषयी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. अमित दोशी म्हणाले, “ब्रिटानिया मारी गोल्डमध्ये महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या वाढीला खतपाणी देणे या गोष्टींशी आमची दृढ बांधिलकी आहे. माय स्टार्टअप स्पर्धेच्या चार यशस्वी पर्वांमधून मिळालेल्या शिकवणूकीतून आमच्या असे लक्षात आले की, या परिसंस्थेला भरभराट साधण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन पुरविणाऱ्या एका मंचाची गरज आहे आणि म्हणूनच या महिला दिनी हरस्टोर च्या साथीने त्या दिशेने पहिले पाऊल उचलत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
हे पहिले पाऊल म्हणून बाजारपेठेचा शुभारंभ आम्ही केला आहे आणि हर स्टोर वर एखादा व्यवसाय चालविण्यातील सुलभता तसेच भारतातील ब्रिटानिया मारी गोल्डच्या विस्तारलेल्या कम्युनिटीची मिळणारी साथ यामुळे महिला उद्योजकांसाठी या परिसंस्थेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण होईल, अशी आमची आशा आहे.”
मलनलो लिन्टास समूहाचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्लोबलचे आशिया पॅसिफिकसाठीचे चीफ स्ट्रॅटेजिक ऑफिसर सुब्रमण्येश्वर एस. (सुब्बु) म्हणाले, “ब्रिटानिया मारी गोल्डचा मोठा ग्राहकवर्ग असलेल्या होममेकर्स किंवा आमचा ब्रॅण्ड ज्यांना ‘एव्हरीडे अॅथलिट्स’ मानतो अशा गृहिणींचे या नावाशी एक घट्ट भावनिक नाते आहे. त्यांना ‘डू मोर बी मोर ’ हा मंत्र प्रत्यक्षात उतरवित अधिक काही करण्यासाठी, अधिक काही बनण्यासाठी सक्षम बनविण्याच्या प्रेरणादायी हेतूने तयार झालेली “हरस्टोर ” ही नवसंकल्पना म्हणजे विमेनप्रेन्युअर्सना सक्षम करण्यासाठी व त्यांना पाठबळ देण्यासाठी उभी राहिलेली एक चळवळ आहे.