पुणे, २८ फेब्रुवारी २०२४ : जेपी मॉर्गन चेसने ने पुण्यात येथे कर्मचाऱ्यांसाठी ११ वा वार्षिक कॉर्पोरेट एम्प्ल़ॉई रन हा भव्य मॅरेथॉन स्वरुपातील सोहळा पुणे विद्यापीठ गणेशखिंड रोड येथे आयोजित केला होता. पर्यावर्णीय शाश्वतता, शून्य-कचरा, विविधता, सर्व समावेशकता आणि ह्यांचा समुदायांवरील प्रभाव या मुल्यांचा संदेश या रनच्या माध्यमातून देण्यात आला. या सोहळ्याने सांघिक सौहार्द, निरोगी जीवनासाठीची वचनबद्धता, शाश्वत जीवनासाठीच्या पद्धती, विविधता आणि सामुदायिक भावना अधोरेखित करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त २७,००० हून अधिक कर्मचारी एकत्र आले आणि त्यातून सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेले सांघिक बंध, त्याचबरोबर समावेशीक अनुभव आणि संस्मरणीय क्षणांची अनुभूती दिसून आली.
या रननिमित्त बोलताना जेपी मॉर्गन चेसच्या भारत आणि फिलिपिन्स विभागाच्या कॉर्पोरेट सेंटर्सचे सीईओ दीपक मंगला म्हणाले, “प्रत्येक वर्षी, जेपीएमसी रनचा विस्तार होत चालला असून त्यात अधिकाधिक उत्स्फूर्तता दिसत आहे. हा सोहळा आपल्या सर्वांसाठी सामायिक ध्येय आणि अनुभवांवर आधारित आठवणींचा अनमोल ठेवा देतो. संस्थेच्या इतर प्रभावी उपक्रमांका व्यतिरिक्त , मुलांचे शिक्षण, कल्याण आणि नैसर्गिक स्थिरता या मूल्यांचा पाठपुरावा करण्याबरोबरच, सांघिक सौहार्दाचा हा वार्षिक उत्सव आम्हाला निरोगी जीवनाच्या भावनेने एकत्र आणतो आणि त्यातून आमच्या वैयक्तिक आणि सामूहिक उद्दिष्टांना पाठबळ देतो.”
यंदा शहरांतील सहभागींना ५ किलोमीटर अथवा १० किलोमीटरच्या ह्या टप्प्यांमध्ये सहभागी होण्याचा पर्याय होता. ह्या व्यतिरिक्त त्याचबरोबर सहसा अशा सोहळ्यात कमी आढळणारे अतिरिक्त गट जसे ४५ वर्षापेक्षा अधिकचा वयोगट तसेच लिंग विरहित यासारख्या गटाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या सोहळ्यात सर्वांगीण समावेशाची भावना आणखी रुजिली गेली. प्रथमच सहभागी होणारे, हौशी आणि कुशल धावपटूांना या सोहळ्याने एकत्र आणले.
“आम्ही दरवर्षी आमची गुणवत्ता वाढवत आहोत आणि त्यातून सांघिक भावना, निरोगी आरोग्य आणि सामुदायिक प्रभावसुध्दा साजरा करत आहोत. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्यात दडलेल्या धावपटूचा उच्च अनुभव घेता येईल, असे एक विश्वही त्यांच्यासाठी तयार करत आहोत,” अशी टिप्पणी भारताचे सिनीअर कंट्री ऑफिसर आणि एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष कौस्तुभ कुलकर्णी यांनी केली.
अपंगत्व, समलिंगी आणि तृतीयपंथी गट , माजी सशस्त्र दल कर्मचारी , महिला आणि आंतरजनीय गटाचा समावेश, पर्यावर्णीय शाश्वतता , निरोगीपणा, सौहार्द आणि समुदायिक प्रभाव या कारणांसाठी आणि मुख्य संकल्पनांना समर्थन देण्याचे वचन देणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत समाजातील विविध घटकांचे मानवी संबंध आणखी दृढ करणारा हा सोहळा एक अनोखे व्यासपीठ ठरले आहे.
द रनचा हा सोहळा बालकल्याण आणि शिक्षण, आरोग्य ह्या उपक्रमांना तर मदत करतोच, परंतु त्याचबरोबर समाजातील अशा मुलांना, विशेषत: जे एचआयव्ही पॉझिटीव्ह आहेत किंवा ज्यांना गंभीर आजार आहेत , अशांना पोषण पेटी, स्वच्छता पेटी , शालेय पुरवठा आणि इतर साहित्यरुपी मदत करून त्यांना सक्षम करत आहे.
जेपी मॉर्गन चेसचा हा कार्यक्रम शून्य-कचरा निर्मित बनवण्यासाठी विविध धोरणांचा अवलंब करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने प्लॅस्टिकचा वापर टाळणे आणि सोहळ्यामधील अन्नाची नासाडी कमी करण्याच्या धोरणाचा अवलंब स्वयंसेवकांनी केला. तसेच ह्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या एकेरी वापराच्या नवीन टी-शर्ट्सऐवजी स्पर्धकांनी आपल्या जवळील वैयक्तिक पोशाख वापरला. शिल्लक खाद्यपदार्थांचा पुनर्वापर करण्यात आला. स्वयंसेवकांनी कचरा संकलन करत त्याचे स्त्रोतनिहाय वर्गीकरण करुन त्याला पुर्नप्रक्रियेसाठी पाठविले.