दुबई येथे अडकलेले पुण्यातील दहा नागरिक व इंदिरा महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरक्षित

By: Editor_Pratik

On: Sunday, March 1, 2026 2:30 PM

Google News
Follow Us

दुबई येथे अडकलेले पुण्यातील दहा नागरिक व इंदिरा महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरक्षित

पुणे, दि. १ मार्च २०२६ : दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील दहा नागरिकांबाबत माहिती प्राप्त झाली असून संबंधितांशी संपर्क साधण्यात आला आहे. सर्वजण सुरक्षित असून प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

अडकलेल्या नागरिकांमध्ये सुहानी चेतन देविदास, जाधव सिद्धेश्वर धनराज, अल्हाट रोहित हरी, गवळी प्रकाश सिताराम, उकरंडे संदीप अशोक, गुळवे गणेश सूर्यकांत, काळे अजय चंद्रशेखर, बंड प्रवीण मच्छिंद्र, भोसले विशाल भरत आणि कुलकर्णी किशोर यांचा समावेश आहे.

याशिवाय पिंपरी-चिंचवड येथील इंदिरा महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी व ५ शिक्षक पंधरा दिवसांच्या शैक्षणिक शिबिरासाठी दुबई येथे गेले असताना तेथील परिस्थितीमुळे अडकले आहेत. संबंधित विद्यार्थी व शिक्षकांशीही संपर्क साधण्यात आला असून ते सर्व सुरक्षित असल्याचे कळते.

प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 12, 2026

October 12, 2026

October 12, 2026

October 11, 2026

October 9, 2026

October 9, 2026