Rashmika–Vijay Net Worth : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे कोट्यवधींचे साम्राज्य चर्चेत

Rashmika–Vijay Net Worth: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे कोट्यवधींचे साम्राज्य चर्चेत

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. उदयपूर येथे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या त्यांच्या शाही विवाहाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, त्याचबरोबर दोघांच्या संपत्ती आणि नेटवर्थबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी केल्यानंतर विजय आणि रश्मिका दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. त्यामुळे अभिनयासोबत जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायातून त्यांनी मोठी संपत्ती उभी केली आहे.

विजय देवरकोंडाचे बिझनेस आणि संपत्ती

‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या विजय देवरकोंडाने अभिनयासोबत व्यवसायातही मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचे अंदाजे नेटवर्थ सुमारे ७० ते ७५ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तो एका चित्रपटासाठी सुमारे १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो.

हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात त्याचे सुमारे १५ कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय ‘Rowdy Wear’ हा कपड्यांचा ब्रँड आणि ‘King of the Hill’ हे प्रोडक्शन हाऊस यांमधूनही त्याला मोठे उत्पन्न मिळते. महागड्या गाड्यांमध्ये फोर्ड मस्टँग, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि व्होल्वो XC90 यांचा समावेश आहे.

रश्मिका मंदाना संपत्तीच्या बाबतीतही आघाडीवर

‘पुष्पा’ चित्रपटानंतर रश्मिका मंदानाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. दक्षिणेतून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करत तिने स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे. तिचे नेटवर्थ अंदाजे ६६ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

रश्मिका एका चित्रपटासाठी ४ ते ८ कोटी रुपये मानधन घेते, तर मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे मानधन १० कोटींपर्यंत जाते. रिअल इस्टेटमध्येही तिची मोठी गुंतवणूक असून बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, गोवा आणि कूर्ग येथे तिची घरे आहेत. बेंगळुरूमधील घराची किंमतच सुमारे ८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय ती विविध मोठ्या ब्रँड्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असून जाहिरातींमधूनही कोट्यवधींची कमाई करते.

स्टार कपलची लोकप्रियता शिखरावर

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दोघेही सध्या तरुणाईत सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी आहेत. अभिनय, ब्रँड व्हॅल्यू आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी मोठी मजल मारली असून त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला आहे.