‘शॉट्स’ हे सर्व ॲक्टिव्ह टाटा प्ले बिंज सबस्क्राइबर्ससाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असून, जाहिरातींसह चालणारे (Ad-supported) माध्यम आहे. जीवनातील छोट्या-छोट्या क्षणांसाठी तयार केलेल्या १ ते २ मिनिटांच्या भागांमधून हे व्यासपीठ प्रवास, रांगा किंवा लहान ब्रेक्सदरम्यान मनोरंजनाचा नवा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.
लाँचच्या टप्प्यावर बुलेट आणि स्टेज हे पहिले कंटेंट पार्टनर्स असून, अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलर प्रकारांतील १६० हून अधिक मायक्रो-ड्रामा प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. येत्या काही महिन्यांत आणखी भागीदार या उपक्रमात सहभागी होणार असून, एकूण ११० तासांहून अधिक शॉर्ट-फॉरमॅट कंटेंट प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे.
पूर्णतः व्हर्टिकल वापरासाठी तयार केलेल्या ‘शॉट्स’मध्ये स्क्रॉल-फ्रेंडली इंटरफेस, ऑटो-नेक्स्ट प्लेबॅक आणि स्मार्ट डिस्कव्हरी फीचर्सचा समावेश आहे. टाटा प्ले बिंज अॅपमध्ये समर्पित होम-पेज रील आणि स्वतंत्र ‘शॉट्स’ विभागाद्वारे हे कंटेंट सहज उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अॅप बदलण्याची किंवा वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज उरत नाही.
लाँचवेळी हिंदीसह तमिळ, तेलुगू, बंगाली, मराठी आदी प्रमुख प्रादेशिक भाषांमध्येही मायक्रो-ड्रामा सादर केले जात आहेत. इश्क किल्स, तलाक के लिए कुछ भी करेगा, रेंट ए बॉयफ्रेंड, मैं हूं अपराजिता (हिंदी), वन लास्ट राइड (तेलुगू) तसेच आफत या प्यार, हॉरर हवेली (राजस्थानी) यांसह १२ वी वाला प्यार आणि गौरव की स्वीटी (हरियाणवी) यांसारखी शीर्षके यात समाविष्ट आहेत.
या नव्या उपक्रमाविषयी टाटा प्लेच्या मुख्य कमर्शियल आणि कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, “व्हर्टिकल आणि शॉर्ट-फॉर्म कथाकथन हे मोबाईलवर कंटेंट पाहण्याचे प्रमुख माध्यम बनत आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी लक्षात घेऊन ‘शॉट्स’ हा एक नैसर्गिक विस्तार आहे. अनेक कंटेंट पार्टनर्सकडील मायक्रो-ड्रामा एकाच ठिकाणी, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
‘शॉट्स’च्या लाँचमुळे टाटा प्ले बिंजचे भारतातील सर्वात व्यापक ओटीटी अॅग्रीगेटर्सपैकी एक म्हणून स्थान अधिक बळकट झाले असून, लाँग-फॉर्म कंटेंटसोबत शॉर्ट-फॉर्म लेयर जोडत प्रेक्षकांचा दैनंदिन सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.





