एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विक्रीमध्ये प्रबळ 23% टक्के वाढ केली
| नोव्हेंबर-२४ | नोव्हेंबर-२५ | वार्षिक वाढ | |
| देशांतर्गत | 1736 | 2765 | 59% |
| निर्यात* | 149 | 118 | -21%* |
| एकूण | 1885 | 2883 | 53% |
*कंपनीने तीन-चाकी व ट्रॅक्टर्सचे उत्पादन बंद केले आहे
फोर्स मोटर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन मेकर व आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने नोव्हेंबर २०२५ साठी २०२४ मधील संबंधित कालावधीच्या तुलनेत देशांतर्गत विक्रीमध्ये वार्षिक 59% टक्के प्रबळ वाढीची नोंद केली.
अर्बनिया व ट्रॅक्स प्लॅटफॉर्म्सच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे ही वाढ झाली. हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स आता एकूण आकारमानांमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देतात. विशेषत:, ट्रॅक्सला ग्रामीण गतीशीलता श्रेणींमध्ये नुकतेच करण्यात आलेल्या जीएसटी सुधारणेचा फायदा झाला आहे, ज्यामुळे ती काहीशी किफायतशीर झाली आहे आणि प्रमुख ग्रामीण व अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये रिप्लेसमेंट मागणीला गती मिळाली आहे.
कंपनीचा प्रमुख पीपल-मोबिलिटी प्लॅटफॉर्म ट्रॅव्हलर स्थिर मासिक सातत्यता आणि वर्षामध्ये आजच्या तारखेपर्यंत उत्तम वाढीसह आकारमानांना दिशा देत आहे. तसेच मोनोबसने देखील वाढलेल्या संस्थात्मक व राज्य परिवहन गरजांमुळे स्थिर नोंद केली.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ साठी फोर्स मोटर्सने वर्षातील आजच्या तारखेपर्यंत 23% टक्के वाढ केली, ज्याचे श्रेय न्यू-जनरेशन प्लॅटफॉर्म्सचा प्रबळ अवलंब आणि मुलभूत ग्राहक श्रेणींमध्ये अधिक मागणीला जाते.
या महिन्यामधील कामगिरीबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, ”आम्हाला आमच्या देशांतर्गत विक्रीमधील स्थिर वाढीचा आनंद होत आहे, ज्यामधून आमच्या विश्वसनीय व शक्तिशाली वेईकल्सच्या श्रेणीमध्ये ग्राहकांचा असलेला दृढ विश्वास दिसून येतो. तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत विक्रीत वार्षिक 59% टक्के प्रबळ वाढ झाली, निर्यातीमधील अपेक्षित चढ-उतारामुळे एकूण आकारमान नियंत्रित राहिले, जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील शिपमेंट चक्रांमुळे विभिन्न होते. असे असताना देखील एकूण विक्रीने वार्षिक 53% टक्के प्रबळ वाढीची नोंद केली, ज्यामधून कंपनीची स्थिर विकास गती दिसून येते.”
कंपनीकडे ग्रामीण परिवहन, कर्मचारी वाहक व सामानांची वाहतूक अशा प्रमुख क्षेत्रांमधून वाढती मागणी होत आहे. भारतभरात पायाभूत सुविधा आणि लास्ट-माइल गतीशीलता विकसित होत असताना फोर्स मोटर्स नाविन्यता आणि ग्राहक समाधानाप्रती कटिबद्ध आहे, जेथे उत्तम कार्यक्षमता आणि कमी मालकीहक्काच्या एकूण कमी खर्चाची खात्री घेत आहे.








