Maharashtra MSME Defence Expo : ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४ मधील दालनांची तयारी पूर्ण; देशातील सर्वात मोठे प्रदर्शन ठरणार
पुणे : ‘सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्रीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ मधून भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचे आणि संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या डिफेन्स एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडणार आहे’,असा विश्वास निबे लिमिटेड चे अध्यक्ष गणेश निबे यांनी आज व्यक्त केला.या महाप्रदर्शनातील निबे लिमिटेडच्या दालनांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.सैन्यदलासाठी निर्माण केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे,तंत्रज्ञान,प्रणाली या दालनांमधून मांडण्यात येणार असून प्रदर्शनाला येणाऱ्या सर्वांना त्याची माहिती देण्यात येणार आहे.ही तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
निबे लिमिटेड ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर आहे . एल अँड टी,सोलर ग्रुप,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड हे स्ट्रॅटेजिक पार्टनर असून उद्योग विभाग महाराष्ट्रच्या वतीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने हे महाप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दि.२४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे( मुख्यमंत्री ,महाराष्ट्र ), देवेंद्र फडणवीस( उपमुख्यमंत्री), अजित पवार(उपमुख्यमंत्री), उदय सामंत (उद्योग मंत्री ) ,सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान,आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रदर्शन स्थळाला भेट देऊन पाहणी केली,पत्रकार परिषदेला संबोधित केले.’महाराष्ट्र डिफेन्स एमएस एम ई एक्स्पो हे प्रदर्शन देशात सर्वात मोठे ठरणार आहे. तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख एकेक दिवस उपस्थित राहणार आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी भेट दयावी’,असे आवाहन आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.मोशी येथे प्रदर्शन स्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत ” ,मेक इन इंडिया या संकल्पनेतून प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्यात संरक्षण क्षेत्रास बळकटी देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र्र डिफेन्स हब उदयास येत आहे. त्याचीच पायाभरणी म्हणून अभिमान, समृद्धि आणि शक्तिचे स्थान असलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्माने पावन झालेल्या पुण्यभूमी मध्ये दिनांक २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मोशी, पुणे येथे महाराष्ट्र एम एस एम ई डिफेन्स एक्सपो २०२४ चे आयोजन करण्यात आले .संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून हे महा प्रदर्शन आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारे असेल,प्रेरणादायी ठरेल,असे गणेश निबे यांनी सांगितले.
या महाप्रदर्शनात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जे विद्यार्थी उपस्थित आहेत ,त्यांना नव्या युगाची फ्युचर टेक्नॉलॉजी ,प्रगत संशोधन पाहण्याची,उद्योगांशी संवाद साधण्याची संधी मिळात आहे.त्यांच्या कारकिर्दीसाठी ते दिशादर्शक आणि प्रेरक ठरेल असा मला विश्वास आहे,पुढील काही दिवसातच भारत हा या क्षेत्रातील महाशक्ती म्हणून आणि एक श्रेष्ठ निर्यातदार म्हणून ठसा उमटवेल. शस्त्रास्त्रांचा एक खरेदीदार ते अत्याधुनिक शस्त्रास्त्रे,संरक्षण सामग्री ,प्रणाली ,कॉम्बॅट व्हेइकल्स,क्षेपणास्त्रे ,सबमरीन ,एयरक्राफ्ट कॅरिअर्स चा श्रेष्ठ निर्यातदार म्हणून आपला देश उभा राहत आहे . केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे निश्चितच दूरदर्शी आणि उपयुक्त सिद्ध झाली आहेत,असेही निबे यांनी सांगितले.
देशातील सर्वात मोठे प्रदर्शन ठरणार : उदय सामंत
‘महाराष्ट्र डिफेन्स एमएस एम ई एक्स्पो हे प्रदर्शन देशात सर्वात मोठे ठरणार आहे. तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख एकेक दिवस उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी भेट दयावी’,असे आवाहन आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.मोशी येथे प्रदर्शन स्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.’निबे लिमिटेड चे गणेश निबे यांच्यासारखे मराठी उद्योजक या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत.त्यांनीही चांगला पुढाकार घेतला आहे. सर्व मान्यवर कंपन्या आपले तंत्रज्ञान प्रदर्शित करीत आहेत.या निमित्ताने महाराष्ट्राची कामगिरी पुढे येईल’,असे त्यांनी सांगितले.हर्षदीप कांबळे,शेखर सिंह,राहुल महिवाल,कौस्तुभ धवसे,गणेश निबे,विजय राठोड,प्रकाश चव्हाण, किशोर धारिया यावेळी उपस्थित होते
चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि मिलिटरी बँडचे सादरीकरण
दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँड चे सादरीकरण होणार आहे.साडे दहा वाजता एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ.जी सतीश रेड्डी संवाद साधणार आहेत.साडेअकरा वाजता जे.डी.पाटील,अरुण रामचंदानी,अनिल कुलकर्णी (एल अँड टी) हे मार्गदर्शन करणार आहेत.१२ वाजता वायुसेनेनेचे मार्गदर्शन तर साडेबारा वाजता एयर फोर्स ड्रिल होईल.दुपारी २ नंतर ‘बुस्टिंग डिफेन्स इकोसिस्टिम’ या चर्चासत्रात ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी,सुंदरम राममूर्ती,सत्यनारायण नुवाल,आशिष सराफ सहभागी होतील.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,उद्योगमंत्री तसेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री,संरक्षण राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत डिफेन्स एक्स्पोचे उदघाटन होईल.हे मान्यवर त्यांनंतर प्रदर्शनातील दालनांना भेट देतील.साडेचार नंतर एयर चीफ मार्शल विवेक राम चौधरी,कर्नल हर्ष अगरवाल,कर्नल पी.गोगोई संवाद साधतील.सायंकाळी ५ वाजता आर्मी बँड चे सादरीकरण होईल.