जगातील अग्रगण्य ज्वेलरी रिटेलर्सपैकी एक — यांनी भारतभरातील त्यांच्या 1531 मायक्रो लर्निंग सेंटर्स (MLCs) मध्ये बालदिन कार्यक्रमांचे आयोजन केले. या केंद्रांद्वारे समर्थित साठ हजारांहून अधिक मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. वरिष्ठ प्रतिनिधी आणि स्थानिक समुदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात मुलांना मिठाई वाटपाने झाली आणि त्यातून शिक्षण, समावेश आणि काळजी यांना समर्पित अशा दिवसाची सुरुवात झाली.
MLC केंद्रे अशा वंचित मुलांना मदत करतात ज्यांना सामाजिक किंवा आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागले किंवा मजुरीत ढकलले गेले. प्रत्येक केंद्रात मुलांना एक वर्षाचे वयोगटानुसार मूलभूत शिक्षण दिले जाते आणि त्यांना पुन्हा औपचारिक शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत केली जाते.
पालक, स्थानिक नेते, पोलिस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच मलबार ग्रुपच्या टीम्स यांनी विविध केंद्रांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मुलांसाठी सहभाग वाढवणाऱ्या आणि आत्मविश्वास विकसित करणाऱ्या लर्निंग अॅक्टिव्हिटीज आणि इंटरअॅक्टिव्ह सत्रांचे आयोजन करण्यात आले.
या केंद्रांमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेत दूध, फळे आणि अंडी असे पौष्टिक आहार नियमितपणे दिला जातो, ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढून शिकण्याची गुणवत्ता सुधारते. स्थानिक समुदायातील प्रशिक्षित पदवीधर येथे शिक्षक म्हणून कार्य करतात आणि एक शिक्षक : चाळीस मुले असा प्रमाण ठेवला जातो. आतापर्यंत या केंद्रांच्या मदतीने सुमारे तीस हजार मुलांना पुन्हा औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे.
या प्रसंगी बोलताना मलबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी सांगितले की ही योजना मुलांच्या दोन मुलभूत गरजांना जोडते — पौष्टिक आहार आणि शिक्षण. ते म्हणाले, “मुलांना सुरक्षितता आणि काळजी मिळाली की ते अधिक चांगले शिकतात. पोषण त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेला बळकटी देते आणि शिक्षण त्यांना दिशादर्शन करते. या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला सन्मानाने स्वतःचे भविष्य घडवण्याची ताकद देतात. आमची मायक्रो लर्निंग सेंटर्स हीच तत्त्वे प्रतिबिंबित करतात आणि आमच्या व्यापक CSR उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहेत.”
ही केंद्रे मलबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमांतर्गत चालवली जातात. या उपक्रमाअंतर्गत भारतात दररोज 1 लाख 5 हजार फूड पॅकेट्सचे वितरण केले जाते, तसेच झांबिया आणि इथिओपिया येथील समुदायांनाही सहकार्य दिले जाते.
मलबार ग्रुपने आतापर्यंत 356 कोटी रुपयांहून अधिक निधी सामाजिक कल्याण कार्यक्रमांमध्ये गुंतवला आहे. या प्रयत्नांचा 17 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. प्रमुख लक्षक्षेत्रांमध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य सहाय्य, मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, आणि वृद्ध महिलांसाठी निवारा व काळजी देणाऱ्या ग्रँडमा होम उपक्रमाचा समावेश आहे.








