दै. आरंभ पर्वचे पत्रकार सचिनजी सुंबे यांना पितृशोक; श्री. लक्ष्मण दशरथ सुंबे (आण्णा) यांचे निधन

लोणी काळभोर : दै. आरंभ पर्वचे निष्ठावान पत्रकार सचिनजी सुंबे यांचे वडील श्री. लक्ष्मण दशरथ सुंबे (आण्णा) (वय ८८) यांचे आज, गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून किरकोळ प्रकृतीत त्रस्त असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सुंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

श्री. सुंबे (आण्णा) हे साधे, शांत स्वभावाचे, समाजाशी नाळ जोडून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. आपल्या परिवाराची कर्तव्यनिष्ठेने सेवा करत आयुष्यभर साधेपणाचा आदर्श जपणारे ते प्रेमळ आणि दयाळू स्वभावाचे होते. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. वयाच्या ८८व्या वर्षीही त्यांची तंदुरुस्ती, प्रसन्न चेहरा आणि मनमोकळा स्वभाव यामुळे ते सर्वांचे लाडके होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुरतुंडे असा मोठा परिवार आहे. संपूर्ण सुंबे कुटुंब आज शोकसागरात बुडाले आहे. परीसरातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच दै. आरंभ पर्व परिवारातील सहकारी यांनी सुंबे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत आपली संवेदना व्यक्त केली आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे. अंत्यदर्शनासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती सुंबे परिवाराने केली आहे.

दै. आरंभ पर्व तथा पुणे प्रहार परिवारातर्फे श्री. लक्ष्मण सुंबे (आण्णा) यांच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच सुंबे कुटुंबास हे दुःख सहन करण्याचे धैर्य लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली.