स्थूलतेच्या उपचारांसाठी नोवो नॉर्डिस्क इंडियाची एमक्योअर फार्मासोबत करार, वेगोव्ही® चा पोविझ्ट्रा® हा दुसरा ब्रँण्ड भारतात दाखल होणार

 

  • एमक्योअर फार्मा ही औषध कंपनी पोविझ्ट्रा®या वजन कमी करण्याच्या औषधाचे वितरण आणि व्यावसायिक विक्री करण्याचे विशेष अधिकार मिळवारी पहिली भारतीय औषध कंपनी ठरली आहे. या करारामुळे एमक्योअर फार्मा आता भारतातील लोकांना स्थूलतेवर अत्यंत प्रभावी आणि जागतिक मान्यताप्राप्त उपचार उपलब्ध करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
  • ही भागीदारी नोवो नॉर्डिस्कच्या प्रयत्नांचा भाग आहे. या भागीदारीतून भारतात अतिरिक्त वजन आणि स्थूलतेने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत नावीन्यपूर्ण सेमाग्लुटाइड रेणू उपलब्ध करुन देता येतील. या माध्यमातून, कंपनीचा उद्देश समाजातील मोठ्या वर्गाला उच्च दर्ज्याचे आणि प्रभावी उपचारपद्धती पुरवणे हा आहे.

नोवो नोर्डिस्क इंडिया आणि एमक्योअर फार्मा या दोन प्रतिथियळश कंपन्यांनी आज महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली. भारतीय औषधविक्रेता बाजारपेठेत पोविझ्ट्रा® (Poviztra®) नावाचे औषध उपलब्ध करुन देणे, पोविझ्ट्रा® सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी पोविझ्ट्रा (Poviztra®) हे सेमाग्लाटाइट इंजेक्शन दिले जाते. देशातील दुर्गम आणि छोट्या शहरांत हे इंजेक्शन वितरित करणे, विक्री आदी प्रक्रिया एमक्योअर फार्माच्या नेटवर्कमुळे आता सहज शक्य होणार आहे. आता औषधांच्या दुकानांमध्येसुद्धा हे वजन कमी करण्याचे प्रभावी औषध सहज उपलब्ध होईल. अनेक भारतीयांना या औषधाचा लाभ घेता येईल.

भारतात जून २०२५ रोजी वेगोव्ही (Wegovy® ) हे सेमाग्युटाइड इंजेक्शन उपलब्ध झाले. वजनाने भारी झालेल्या किंवा स्थूलपणाचा सामना करणा-या रुग्णांचे वजन आटोक्यात येण्यासाठी हे इंजेक्शन दिले जाते.  तसेच रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही डॉक्टर्स हे इंजेक्शन देतात. याकरिता सुरुवातीला डॉक्टर्स कमी कॅलरीयुक्त आहारावर भर देतात. रुग्णाची शारिरीक हालचाल वाढल्यानंतर पूरक उपचारपद्धती म्हणून हे इंजेक्शन दिले जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये वेगोव्हीचा वापर करणा-या प्रत्येक तीनपैकी एका सहभागी व्यक्तीने २० टक्क्यांपेक्षा जास्त वजनात घट झाल्याचे अनुभवले आहे. पोविझ्ट्रा® हे वेगोव्ही®चे दुसरे ब्रँण्ड आहे.

देशभरातील जास्तीत जास्त रुग्णांना नावीन्यपूर्ण उपचारपद्धती पोहोचवता यावी, याकरिता नोवो नॉर्डिक्स इंडियाने एमक्योअरसोबत ही भागीदारी केली. वजन कमी करण्यास मदत करणारे उच्च दर्ज्याचे, सुरक्षित आणि प्रभावी औषध सर्वांपर्यंत पोहोचावे हे उद्दिष्ट या भागीदारीतून साध्य केले जाईल. या करारानुसार, एमक्योअर फार्मा कंपनी भारतात पोव्हिझट्रा® हे सेमाग्लुटाइड इंजेक्शन २.४ मिग्रॅ च्या व्यावसायिक विक्री आणि विपणनासाठी जबाबदार असेल.

या भागीदारीबद्दल नोवो नॉर्डिस्क एशिया पॅसिफिक क्षेत्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष जय त्यागराजन यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘स्थूलता हा एक गंभीर आणि दीर्घकालीन आजार आहे. या आजारामुळे लाखो भारतीय त्रस्त आहेत. मोठ्या संख्येमुळे उपचारांमध्येही बाधा येत आहे. स्थूलतेच्या उपचारांमधील आव्हाने लक्षात घेत आम्ही काही महिन्यांपूर्वीच वेगोव्ही®चे अनावरण केले. स्थूलतेशी झगडणा-या अधिकाधिक रुग्णांना उच्च गुणवत्तेचे, सुरक्षित आणि प्रभावी उपचार पोहोचण्याचे उद्देश्य गाठण्यासाठी एमक्योअर फार्मासोबत हातमिळवणी करताना आम्हांला आनंद होत आहे. ही भागीदारी जीएलपी-१ थेरपीमधील नोवो नॉर्डिस्कचे नाविन्य आणि एमक्योअरची मजबूत विपणन व वितरणक्षमता यांना एकत्र आणते. या भागीदारीमुळे देशातील स्थूलतेचा आजार असलेल्या रुग्णांना सहज उपचार उपलब्ध होतील.’’

सूचना – संबंधित प्रसिद्धिपत्रक केवळ पोव्हिझट्रा®  सेमाग्युटाइड इंजेक्शन २.४ मिग्रॅ) या औषधाच्या वैद्यकीय वापरासंबंधी माहिती पुरवण्यासाठी आहे. या दस्तावेजात पोव्हिझट्रा®चा उल्लेख करण्यात आला असला तरीही या औषधाचा प्रचारात्मक संदेश किंवा जाहिरात संदेश देणे हा उद्देश नाही. या औषधाचा वापर परवाना प्राप्त आरोग्यसेवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या वैद्यकीय निर्णयानुसारच करावा. प्रत्येक व्यक्तीची शारिरीक गरज वेगळी असू शकते. वैयक्तिक गरजांनुसार योग्य उपचार आणि औषधोपचारांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

या भागीदारीबद्दल एमक्योअर फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, ‘‘नोवो नॉर्डिस्क इंडियासोबत भागीदारी करुन पोव्हिझट्रा® भारतात उपलब्ध करुन देताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि विश्वसनीय जीएलपी आधारित वजन कमी करणारे रेणू भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करुन देणारी पहिली भारतीय औषध कंपनी असल्याने आम्हांला याबद्दल अभिमान आहे. सेमाग्युटाइडच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. देशाच्या विविध भौगोलिक स्थितीचे आम्हांला मजबूत आकलन आहे. आमच्या सक्षम विपणन क्षमतांमुळे गरजू रुग्णांसाठी हे रेणू उपलब्ध करुन देण्यास आम्ही तयार आहोत.’’